शाळेतील पहिला दिवस

COVIDSchool 1024x585 1 शाळेतील पहिला दिवस

जून महिना उजाडला की मला शाळेची आठवण येऊ लागते. या वर्षीही शाळेची खूप आठवण आली. १५ जूनला मी उत्साहात शाळेत पोहोचलो. इयत्ता सातवीच्या वर्गात मी गेलो. सगळे मित्रमैत्रिणी माझी वाट पाहत होते. एकमेकांना पाहून आनंद व्यक्त केला. थोडीशी दंगामस्ती केली. एकमेकांना चिडवले. एका सुरात गाणी म्हटली.

 

काही वेळाने नवा वर्ग, नवी पुस्तके यांच्याबद्दल गप्पा झाल्या. आदल्या वर्षीची सर्व मुले माझ्या वर्गात होती. दोन-तीन नव्या मुली माझ्या वर्गात दिसल्या. आम्ही त्यांची ओळख करून घेतली. माझा मित्र श्रेयस वर्गात दिसला नाही. तो हैदराबादला राहायला गेला आहे.

 

काही वेळाने मायरा मॅडम वर्गात आल्या. त्या आमच्या वर्गशिक्षका होत्या. त्यांच्याबरोबर खूप गप्पा मारल्या. आज प्रत्येक जण बोलत होता; कारण तो शाळेचा पहिला दिवस होता.

अधिक निबंधांसाठी :