The Thirsty Crow Story

[मुद्दे : तहानलेला कावळा – पाण्याचा शोध – एक मडके दिसले – खूप कमी पाणी – विचार केला – एक-एक दगड आणून टाकला – पाणी वर आले पाणी प्याला.]

हुशार कावळा

एक होता कावळा. एकदा त्याला लागली तहान. त्याने इकडे-तिकडे पाहिले. जवळपास पाणी नव्हते. तो खूप फिरला; पण पाणी मिळाले नाही.

 

अखेर त्याला एक मडके दिसले. तो भुर्रकन तेथे गेला. आत डोकावून पाहिले. मडक्यात पाणी होते. त्याला खूप आनंद झाला.

 

पण पाणी कसे पिणार? ते तर मडक्याच्या तळाशी होते. आता काय करावे? त्याने खूप विचार केला. त्याला एक युक्ती सुचली.

 

त्याने चोचीतून एक दगड आणला. हळूच मडक्यात टाकला. पाणी थोडे वर आले. दुसरा दगड आणला. हळूच मडक्यात टाकला. पाणी आणखी थोडे वर आले. असे त्याने खूप दगड टाकले. पाणी खूप वर आले. कावळ्याला आनंद झाला. तो पोटभर पाणी प्याला. मोठ्या आनंदाने कावकाव करत उडून गेला.