निबंध लेखन
Composition / Paragraph / Essay Writing

माझा आवडता खेळ

khokho6 माझा आवडता खेळ

खो-खो हा माझा आवडता खेळ आहे. हा खेळ मैदानात खेळतात. या खेळासाठी कोणत्याही वस्तू आणाव्या लागत नाहीत. कोणताही खर्च करावा लागत नाही. गरीब-श्रीमंत सर्व मुले हा खेळ खेळू शकतात.

 

खो-खो या खेळात दोन संघ असतात. एका संघातील मुले खो-खोसाठी बसतात. दुसऱ्या संघातील मुले त्यांच्याभोवती पळतात. खो देणारी मुले पळणाऱ्या मुलांना पकडतात. पकडलेली मुले बाद होतात. अशा प्रकारे दोन्ही संघ आलटून पालटून खेळतात.

 

खो-खो या खेळामुळे आपण चपळ बनतो. आपल्या शरीराला खूप व्यायाम मिळतो. मित्रांबरोबर खेळण्याचा आनंद मिळतो. या सगळ्या गोष्टींमुळे मला खो-खो हा खेळ फार आवडतो.