पाठ – व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन)
We have studied about the world dictionary in Std. IX. We have seen how we can get different references for any word from the world dictionary. How have these words come into being? To figure this out, it is necessary to refer to the etymological dictionary. To recognize the need for, and to get habituated to the etymological dictionary is the aim of this lesson.
कृती
(१) टीप लिहा.
व्युत्पत्ती कोशाचे कार्य
उत्तर: वाचन करताना अनेक वेगवेगळे शब्द डोळ्यांखालून जातात. काही शब्द लक्ष वेधून घेतात. हे शब्द कसे तयार होत असावेत याची उत्सुकता निर्माण होते. मग अशावेळेस त्या शब्दाची निर्मिती कशी झाली हे पडताळण्यासाठी व्युत्पत्ती कोश उपयोगी पडतो. व्युत्पत्ती कोश शब्दाचे मूळ रूप दाखवतो. इतकेच नव्हे तर त्यातील विस्तार संदर्भ, उच्चारातील बदल व फरक दाखवतो. याची उत्पत्ती पाहणे, उच्चार जाणून घेणे ही भाषासमृद्धीच्या दृष्टीने आनंददायी क्रिया आहे. एकाच शब्दाचे वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळे अर्थ असतात, हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उदा. धूळ चारणे; खरे पाहता धूळ चारणे व फसवणे हे दोन अर्थ आहेत. वेगवेगळ्या संदर्भानुसार ते ते अर्थ जुळवले जातात. व्युत्पत्ती कोशातून उच्चारातील बदलांचे कारण स्पष्ट होते. अर्थातील स्पष्ट केलेला बदल अभ्यासता येतो. व्युत्पत्ती कोशातून एखाद्या शब्दाची अन्य कोणी मांडलेली व्युत्पत्ती सांगून ती योग्य व अयोग्य हे ही कळते. भाषेचे कालिक स्वरूप स्पष्ट करणे हे व्युत्पत्ती कोशाचे प्रमुख कार्य आहे.
Many different words pass under the eyes while reading. Some words attract attention. The curiosity arises as to how these words should be formed. Then a etymological dictionary comes in handy to verify how the word was formed. A etymological dictionary shows the original form of the word. Not only this, its expansion shows context, pronunciation changes and differences. Seeing its origin, learning the pronunciation is a pleasant activity in terms of language enrichment. It is very important to know that the same word has different meanings in different situations. e.g. scam, in fact, scam and cheating are two meanings. These meanings are adapted according to different contexts. Etymology explains the reason for the changes in pronunciation. A pronounced change in meaning can be studied. It is known whether the etymology of a word is correct or incorrect by referring to the etymology suggested by someone else. A major function of an etymology is to explain the temporal nature of a language.
(२) खालील मुद्द्यांच्या आधारे एक परिच्छेद तयार करा. (७ ते ८ वाक्यांत)
उत्तर: १९३८ साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर या संमेलनाचे अध्यक्ष होते. ‘व्युत्पत्ती कोश रचनेचे कार्य हाती घ्यावे’ असा ठराव संमेलनात मंजूर करण्यात आला. सर्वांच्या मतानुसार हे कार्य कृ. पा. कुलकर्णी यांच्यावर सोपविण्यात आले. बॅ. मुकुंदराव जयकर यांच्या आर्थिक सहकार्यामुळे व श्री. दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे व्युत्पत्ती कोश निर्मितीस भरीव मदत झाली. तसेच सर्वांच्या सहकार्यामुळे १९४६ साली ‘मराठी व्युत्पत्ती कोशाचे’ पहिले प्रकाशन झाले.
In 1938, the All India Marathi Literary Conference was held in Mumbai. Swatantra Veer Savarkar was the president of this meeting. A resolution was passed in the meeting that ‘the work of etymology should be taken up’. According to everyone’s opinion, this work was done by Mr. Pa. Kulkarni. The financial support of B. Mukundarao Jaykar and Mr. Dajisaheb Tuljapurkar’s sponsorship greatly helped in the creation of etymology. Also, due to the cooperation of all, the first publication of ‘Marathi Vyutpatti Kosha’ took place in 1946.
(३) पाठाबाहेरची उदाहरणे शोधून खालील कृती करा.
उत्तर:
(i) शब्द अनेक, अर्थ एक :
(ii) शब्द एक, अर्थ अनेक :
एकच शब्द वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळे अर्थ धारण करतो.
उपक्रम : शिक्षकांच्या मदतीने व्युत्पत्ती कोशातून खालील शब्दांची व्युत्पत्ती शोधून लिहा.
(अ) प्रावीण्य
उत्तर: (विशेषण) हुषार, चतुर संप्र वीणा वीणा वाजविण्यात कुशल. या शब्दात लक्षण आहे. कौशल्याने काम करणारा तो प्रवीण व कामात कौशल्य ते प्रावीण्य. अशा अर्थाचा हा शब्द आहे.
(आ) चिल्लर
उत्तर: स्वी. मोड, नाश (लक्षणा) द्रा. कान. चिलवान् रकमेवरील खुर्दा, चिल्लर = लहानपणा, लघुत्व, कान. चिल्हे, चिल्रे लहान.
(इ) वीज
उत्तर: वीज (स्त्री), संस्कृत विद्युत्, (प्रा) विज्जु (पुं), विज्जुआ.
(ई) गुपचूप
उत्तर: अ. गप्प
संज्ञा गुंफचुप – (द्विधातुसंयोग)
गुपितें (नरूस्व २१९)