पाठ १६ – स्वप्न करू साकार
With a consolidated effort, we can have good-quality grains. United endeavors can lead to the prosperous future of our country. This is the message given by the poet. The poem motivates us to strive for an agricultural and industrial revolution.
ललकारणे – पुकारणे.
नौबत – डंका, मोठा नगारा.
विभव – ऐश्वर्य, भाग्य, संपत्ती.
या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार
नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार ।।
अर्थ : कवीने आपल्या भारत देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न सुंदरपणे रेखाटले आहे. कवी म्हणतात की, या देशाची माती, येथील संस्कृती, येथील परंपरा आम्हा भारतीयांची आहे. त्यावर फक्त आमचाच अधिकार आहे. मुळात भारत हा कृषिप्रधान | देश आहे. शेतकरी हा इथला भूमिपुत्र आहे. या शेतकऱ्याचा या मातीवर परंपरेपासून खरा अधिकार आहे. काळ्या मातीची मशागत करून धनधान्याची निर्मिती करणे व धरतीला सुजलाम् सुफलाम् करणे हे त्याचे कर्तव्यच आहे. त्यासाठी तो आयुष्यभर कष्ट करत असतो. त्याच्या कष्टातूनच कृषिसंस्कृती निर्माण होते. या कृषिसंस्कृतीमुळेच नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न साकार होत असते. म्हणूनच कवी म्हणतात की, येथील संस्कृती, येथील परंपरा यांचे जतन करून आपण सारेजण नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न साकार करूया.
English Translation:
The poet has beautifully drawn the dream of the bright future of our country, India. The poet says that the soil of this country, its culture, and its traditions belong to us Indians. Only we have the right to it. India is basically an agrarian country. The farmer is the son of the soil here. This farmer has a real right over this soil from tradition. It is his duty to cultivate the black soil to produce rich grains and to improve the soil. He has worked hard for it all his life. It is through his hard work that the agricultural culture is created. It is because of this agricultural culture that the dream of a new generation and a new era is being realized. That is why the poet says that by preserving the culture and traditions of this place, we can all realize the dream of a new generation and a new era.
फुलामुलांतून हसतो श्रावण
मातीचे हो मंगल तनमन
चैतन्याचे फिरे सुदर्शन
शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार ।।
अर्थ : कवीने आपल्या भारत देशाच्या उज्ज्वल भविष्याचे सुंदर स्वप्न रेखाटतांना कृषिसंस्कृतीचे महत्त्व आपल्याला पटवून दिले आहे. कवी म्हणतात की, शेतकऱ्यांच्या कष्टांमुळेच फुलामुलांतून श्रावण हसत असतो. म्हणजेच श्रावण महिन्यामध्ये सारी धरती व तिची बाळे आनंदित होतात. खरे तर ऊनपावसाचा खेळ चालू असणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये धरती हिरव्या रानांनी, पाना-फुलांनी सजलेली असते. शेतकऱ्यांच्या मेहनतीने, कष्टाने इथली माती म्हणजेच इथली शेते धनधान्याने डोलू लागलेली असतात. धरतीचे हे सौंदर्य पाहून सगळे जण आनंदित होतात. चैतन्यमय, प्रसन्न वातावरण सर्वत्र निर्माण झालेले असते. ज्याप्रमाणे सुदर्शनचक्र फिरले की, दुःखाचा, अडचणींचा नाश होतो आणि सर्वत्र आनंद पसरतो, त्याचप्रमाणे शेतकरी जणू आपल्या कष्टाने चैतन्याचे, आनंदाचे सुदर्शनचक्र फिरवत असतो. त्याच्या मेहनतीमुळेच शेताशेतांतून धान्यरूपी मोत्याचे ‘सुदर्शन’ आपल्याला घडते. त्याच्याबरोबर मेहनत करून आपणही या शेतातून, मातीमधून मोती म्हणजेच धान्यरूपी अपार धन पिकवूया. आपल्या धरतीला सुलजाम् सुफलाम् बनवूया.
English Translation:
The poet has convinced us of the importance of agriculture while drawing a beautiful picture of the bright future of our country, India. The poet says that Shravan is smiling through the flowers because of the farmers’ hardships. That is, in the month of Shravan, the whole earth and its babies rejoice. In fact, in the month of Shravan, when the game of summer and rain is going on, the earth is decorated with green fields, leaves, and flowers. With the hard work of the farmers, the soil here means the fields here are beginning to sway with rich grains. Everyone is happy to see the beauty of the earth. A lively, cheerful atmosphere is created everywhere. Just as when the sudarshan chakra rotates, sorrow and difficulties are destroyed and happiness spreads everywhere, similarly, the farmer rotates the sudarshan chakra of consciousness and happiness with his hard work. It is due to his hard work that we get ‘Sudarshan’ of pearls in the form of grains from the fields. By working hard with him, let us also grow immense wealth in the form of pearls from this field and from the soil. Let’s make our land Sujalam Sufalam.
या हातांनी यंत्र डोलते
श्रमशक्तीचे मंत्र बोलते
उद्योगाचे चक्र चालते
आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार ।।
अर्थ : भारत देशाच्या उज्ज्वल भविष्याचे चित्र रेखाटताना कवी पुढे म्हणतात की, भारत हा कृषिप्रधान देश असला तरी इथे इतर उदयोगधंदेही चालतात. देशातील अनेक जण यंत्राच्या सहाय्याने काम करून उद्योगचक्रात मग्न आहेत. जसे शेतकरी, मजूर शेतात राबून शारीरिक कष्ट करत आहेत. तसेच अनेक कामगार यंत्रावर काम करत आहेत. त्यांच्या श्रमामुळे यंत्र डोलतात म्हणजेच यंत्र चालतात व प्रगतीची चाके फिरू लागतात. या यंत्रातून येणारा आवाज ऐकून कवीला असे वाटते, जणू हा नुसता आवाज नाही तर श्रमशक्तीचा मंत्र चालू आहे. कवी म्हणतात की, सारेजण श्रमशक्तीचा मंत्र जपत आहेत, म्हणजेच कष्ट करत आहेत व आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावत आहेत. उद्योगाचे हे चक्र सदैव चाललेलेच आहे. आपणही त्यामध्ये सहभागी होऊन नवनवे शोध लावूया. शेतीमध्ये नवेनवे बदल नव्या सुधारणा आणून तसेच उदयोगक्षेत्रांमध्ये नव्या संकल्पना आणून आपली व आपल्या देशाची भरभराट करूया. तसेच नव्या उत्क्रांतीचा म्हणजे नव्या बदलांचा, नव्या शोधांचा, नव्या संकल्पनांचा सगळ्या आभाळावर ललकार घुमवूया म्हणजेच सान्या जगामध्ये नव्या गोष्टींचा जयजयकार करूया. सगळ्या जगभर हे नवे शोध, नव्या संकल्पना आपण आपल्या मेहनतीने पोहचवूया.
English Translation:
While drawing a picture of India’s bright future, the poet further says that though India is an agricultural country, other industries are also running here. Many people in the country are engaged in the industrial cycle of working with the help of machines. Like farmers, laborers are doing physical labor in the fields. Also, many workers are working on the machine. Due to their labor, the machine swings, i.e., the machine moves, and the wheels of progress start turning. Hearing the sound coming from this yantra, the poet feels as if it is not just a sound but a mantra of the labor force. The poet says that everyone is chanting the mantra of Shram Shakti, i.e., working hard and contributing to the progress of our country. This cycle of industry is always going on. Let us also participate in it and make new discoveries. Let us prosper ourselves and our country by bringing about new changes in agriculture and new concepts in industries. Also, let’s shout about new evolution, new changes, new discoveries, and new concepts in all the sky; that is, let’s cheer for new things in the world. Let us bring this new discovery and this new concept to the whole world with our hard work.
हजार आम्ही एकी बळकट
सर्वांचे हो एकच मनगट
शक्तीचीही झडते नौबत
घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार ।।
अर्थ : कवीने आपल्या भारत देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकजूटीचा मंत्र सांगितला आहे. एकजूटीचे सामर्थ्य पटवून देतांना कवी म्हणतात की, आमच्या देशात अनेक प्रकारची विविधता आहे. वेश, भाषा, धर्म, सण, खाणे अशी हजारो प्रकारची विविधता असली तरी आम्ही एकच आहोत. आमच्यातील एकता जराही कमी झालेली नाही. आम्ही भारतीय लोक देशाच्या विविध प्रांतात राहणारे असलो, वेगवेगळी भाषा बोलणारे जरी असलो, वेगवेगळे वेश घालणारे जरी असलो तरी आम्ही एकजूटीने कार्य करणारे आहोत. त्यामुळे आमच्या हाताचे मनगट बलशाली, शक्तीशाली असेच आहे. याच एकजूटीने आपण आजवर अनेक कठीण प्रसंगावर मात केलेली आहे व पुढेही करत राहू. याच शक्तीने, एकीच्या बळाने आपल्या देशाची प्रगती होईल. शत्रूला धाक बसेल, शक्तीचे प्रदर्शन होईल तसेच एकात्मतेची भावना लोकांच्या मनात अजून वाढेल, जणू सर्वत्र शक्तीची नौबत झडेल. इथे जन्माला येणारे प्रत्येक बाळ तेजस्वी व प्रबळ असेल. देशाचे रक्षण करण्यासाठी, नवीन कार्यासाठी घराघरातून जणू नवी पिढी जन्म घेईल आणि आपल्या शक्तीतून आपल्या कार्यातून आपल्या विजयाचा अवतार साऱ्या जगासमोर उभा करेल. म्हणजेच सामर्थ्यशाली बालके जन्मास येऊन देशाचे भविष्य नक्कीच उज्ज्वल करतील, असा एक आशावाद कवीने येथे मांडलेला आहे.
English Translation:
The poet has sung the mantra of unity for the bright future of our country, India. Convincing us of the power of unity, the poet says that our country has many kinds of diversity. Though there are thousands of differences in dress, language, religion, festivals, and food, we are one. Our unity has not diminished at all. We Indians live in different parts of the country, speak different languages, and wear different clothes, but we are united. So our wrists are strong and powerful. With this unity, we have overcome many difficult situations and will continue to do so. With this power and the strength of one, our country will progress. The enemy will be intimidated, there will be a display of power, and the feeling of unity will increase in the minds of the people, as if there will be a wave of power everywhere. Every baby born here will be bright and strong. To protect the country, a new generation will be born from every house for a new task, and with its strength, through its work, it will present the avatar of its victory in front of the whole world. In other words, the poet has expressed optimism here that strong children will be born, which will surely brighten the future of the country.
या विश्वाची विभव संपदा
जपू वाढवू आम्ही लाखदा
हस्त शुभंकर हवा एकदा
भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जयजयकार ।।
अर्थ : आपल्या भारत देशाला हजारो वर्षांचा इतिहास लाभलेला आहे. आपली संस्कृती अतिप्राचीन व उच्च आहे. कृषिसंस्कृती, श्रमप्रतिष्ठा तसेच एकजूटीचे सामर्थ्य या मूल्यांमुळे साऱ्या जगात आपल्या देशाने मानाचे स्थान संपादन केले आहे. म्हणून कवी म्हणतात की, आपल्या देशाची ही वैभवशाली संपदा आपण मनापासून जपू तिचे रक्षण करू आणि तिच्यामध्ये चांगली भर घालून तिला वाढवू. त्यासाठीच कृषिसंस्कृती, श्रमप्रतिष्ठा तसेच एकजूटीचे सामर्थ्य ही मूल्ये आपण मनापासून जपली पाहिजेत. या मूल्यांचा आदर वाढविणारा, आपल्या देशाच्या वैभवशाली संपदेला सांभाळणारा शुभंकर, कल्याणकारी हात मात्र हवा अशी इच्छा कवी व्यक्त करतात. त्यामुळे आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल होईल. तसेच सर्वत्र आपल्याच देशाचा जयजयकार होईल.
English Translation:
Our country, India, has thousands of years of history. Our culture is very ancient and rich. Our country has acquired a place of honor all over the world due to the values of agricultural culture, dignity of labor, and strength of unity. So the poet says that we will cherish this glorious wealth of our country, protect it, and increase it by adding good to it. That is why we should cherish the values of agricultural culture, dignity of labor, and strength of unity. The poet expresses his wish for a mascot, a benevolent hand that would increase respect for these values and take care of the glorious wealth of our country. So the future of our country will be bright. Also, our own country will be cheered everywhere.
कृती
(१) खालील शब्दसमूहांतील संकल्पना स्पष्ट करा.
(अ) श्रमशक्तीचे मंत्र –
उत्तर: श्रमाचे महत्त्व
(आ) हस्त शुभंकर –
उत्तर: रावणारे हात, पवित्र हात
(इ) आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार –
उत्तर: उत्क्रांतीचा, प्रगतीचा जयघोष
(२) आकृती पूर्ण करा.
(अ)
उत्तर:
(आ)
उत्तर:
(३) काव्यसौंदर्य.
(अ) खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार
नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार ।।
उत्तर: या देशाची माती, संस्कृती, परंपरा आमची भारतवासीयांची आहे. त्यावर आमचा अधिकार आहे. त्यांचे जतन करून नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न साकार करायचे आहे.
कवीने आपल्या भारत देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न सुंदरपणे रेखाटले आहे. कवी म्हणतात की, या देशाची माती, येथील संस्कृती, येथील परंपरा आम्हा भारतीयांची आहे. त्यावर फक्त आमचाच अधिकार आहे. मुळात भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकरी हा इथला भूमिपुत्र आहे. या शेतकऱ्याचा या मातीवर परंपरेपासून खरा अधिकार आहे. काळ्या मातीची मशागत करून धनधान्याची निर्मिती करणे व धरतीला सुजलाम् सुफलाम् करणे हे त्याचे कर्तव्यच आहे. त्यासाठी तो आयुष्यभर कष्ट करत असतो. त्याच्या कष्टातूनच कृषिसंस्कृती निर्माण होते. या कृषिसंस्कृतीमुळेच नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न साकार होत असते. म्हणूनच कवी म्हणतात की, येथील संस्कृती, येथील परंपरा यांचे जतन करून आपण सारेजण नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न साकार करूया.
The soil, culture and tradition of this country belong to our Indians. We have a right to it. We want to realize the dream of a new generation and a new era by preserving them.
The poet has beautifully drawn the dream of the bright future of our country India. The poet says that the soil of this country, its culture, its traditions belong to us Indians. Only we have the right to it. India is basically an agricultural country. The farmer is the son of the soil here. This farmer has a real right over this soil from tradition. It is his duty to cultivate the black soil to produce rich grains and to improve the soil. He is working hard for it all his life. It is through his hard work that the agricultural culture is created. It is because of this agricultural culture that the dream of a new generation, a new era is being realized. That is why the poet says that by preserving the culture and traditions of this place, let us all realize the dream of a new generation, a new era.
(आ) खालील पंक्तींमधून सूचित होणारा अर्थ लिहा.
शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार ।।
उत्तर: शेतकरी जणू आपल्या कष्टाने चैतन्याचे, आनंदाचे सुदर्शनचक्र फिरवत असतो. त्याच्या मेहनतीमुळेच शेताशेतांतून धान्यरूपी मोत्याचे ‘सुदर्शन’ आपल्याला घडते. त्याच्याबरोबर मेहनत करून आपणही या शेतातून मातीमधून मोती म्हणजेच धान्यरूपी अपार धन पिकवूया. आपल्या धरतीला सुलजाम् सुफलाम् बनवूया.
It is as if the farmer is spinning the sudarshanchakra of consciousness and happiness with his hard work. It is due to his hard work that we get ‘Sudarshan’ of pearls in the form of grains from the fields. By working hard with him, let us also grow immense wealth in the form of pearls from the soil from this field. Let’s make our land Suljam Suflam.
घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार ।।
उत्तर: इथे जन्माला येणारे प्रत्येक बाळ तेजस्वी व प्रबळ असेल. देशाचे रक्षण करण्यासाठी नवीन कार्यासाठी घराघरातून जणू नवी पिढी जन्म घेईल आणि आपल्या शक्तीतून, आपल्या कार्यातून आपल्या विजयाचा अवतार सान्या जगासमोर उभा करेल. म्हणजेच सामर्थ्यशाली बालके जन्मास येऊन देशाचे भविष्य नक्कीच उज्ज्वल करतील, असा एक आशावाद कवीने येथे मांडलेला आहे.
Every baby born here will be bright and strong. A new generation will be born from every house for a new task to protect the country and Sanya will present the avatar of his victory in front of the world through his strength and his work. In other words, the poet has expressed an optimism here that strong children will be born and will surely brighten the future of the country.
(इ) या कवितेत कवीने बघितलेले स्वप्न तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर: ‘स्वप्न करू साकार’ कवितेत श्री किशोर पाठक यांनी देशाच्या उज्जवल भविष्याचे स्वप्न रंगविले आहे. देशात नव्या पिढीचे आगमन होत आहे. नवे युग चालू आहे तेव्हा नवीन कल्पना, नवी उमेद आहे. कवीला देशाच्या मातीतून मोती पिकवायचे आहेत. भरघोस धान्याचे पिक घ्यायचे आहे. मातीचा कस सुधारायचा आहे. श्रावणसरींनी हसणाऱ्या, फुलणाऱ्या फुलांना व मुलांना पहायचे आहे. श्रमप्रतिष्ठेवर भर देऊन प्रयत्नांची कास धरायची आहे. औद्यौगिक प्रगती करायची आहे. एकोप्याने देशाची वैभव संपदा केवळ जपायचीच नाही तर वाढवायची आहे.
नव्या पिढीला श्रमशक्ती, यंत्र यांचा मंत्र दयायचा आहे. देशासाठी झटणारे शुभंकर, कल्याणकारी हात तयार करायचे आहेत. देशाचे नाव उज्ज्वल करून सगळ्या जगात आपल्या देशाचा नावलौकिक वाढवायचा आहे.
In the poem ‘Swapna Karu Sakar’, Shri Kishore Pathak has painted the dream of a brighter future for the country. A new generation is coming to the country. As a new era begins, there are new ideas, new hopes. The poet wants to grow pearls from the soil of the country. A rich grain crop is to be taken. The quality of the soil is to be improved. Shravanasaris want to see smiling, blooming flowers and children. Efforts should be made with emphasis on labor dignity. Industrial progress is to be made. Unity is not only to preserve the glory of the country but also to increase it.
The new generation wants to give the mantra of Shram Shakti and Yantra. We want to create mascots, welfare hands that work hard for the country. We want to increase the reputation of our country all over the world by brightening the name of the country.
(ई) कवितेत व्यक्त झालेला एकात्मतेचा विचार स्पष्ट करा.
उत्तर: प्रस्तुत कवितेत श्री. किशोर पाठक यांनी ‘एकजूटीचे सामर्थ्य’ हे मूल्य मनात रूजविण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे. कोणतेही काम एकट्याने करून पूर्ण होत नाही. घरी तयार होणाऱ्या अन्नपदार्थांसाठी अगदी शेतकरी दादा पासून, दुकानदार, कामगार, वाहतूक या सर्व घटकांची मदत आवश्यक असते. तसेच देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकजूटीने काम करणे तितकेच महत्त्वाचे आहे.
‘हजार आम्ही एकी बळकट, सर्वांचे हो एकच मनगट’ या पंक्तीवरून सिद्ध होते की, देशाची जनता एकत्र आली तर मनगटात बळकटी येईल व प्रगती शक्य होईल. सर्वांची शक्ति पणाला लावून कृषि व उद्योग यामध्ये उत्क्रांती होईल. या मातीवर जसा सर्वांचा अधिकार आहे, तसाच सर्वांनी मिळून मिसळूनच नव्या युगाचे स्वप्न साकारायचे आहे. भारताची संस्कृती व परंपरा थोर आहे, पण ती जपून वाढवायची आहे. हे एकजूटीने साध्य होणार आहे. साऱ्या विश्वात एकजुटीने भारताचा जयजयकार करायचा आहे.
In the presented poem Mr. Kishore Pathak has made a beautiful effort to inculcate the value of ‘strength of unity’. No work is done alone. Home-made food requires the help of all the factors, right from the farmer, shopkeepers, workers, transport. Also it is equally important to work together for the bright future of the country.
The line ‘हजार आम्ही एकी बळकट, सर्वांचे हो एकच मनगट‘ proves that if the people of the country come together, the wrist will be strong and progress will be possible. There will be evolution in agriculture and industry by harnessing the power of all. As everyone has the right to this soil, everyone has to work together to realize the dream of the new era. India’s culture and tradition is great, but it needs to be preserved and nurtured. This will be achieved through unity. The entire world wants to cheer India together.