Maharashtra Board Textbook Solutions for Standard Ten

पाठ १४ – बीज पेरले गेले

Bij Perle Gele is written by Chandu Borde. He speaks of his childhood memories, including how he got inclined towards playing cricket.

भुरळ पडणे – एखाद्या गोष्टीविषयी आवड निर्माण होणे. 

कनात – तंबू, डेरा, येथे क्रिकेटच्या मैदानाच्या बाजून उभारलेली कापडी भिंत.

कृती

(१) कारणे लिहा.

(अ) लेखकाच्या आई-वडिलांनी मन घट्ट करून मुलांचा निरोप घेतला, कारण ______

उत्तर: लेखकाच्या आई-वडिलांनी मन घट्ट करून मुलांचा निरोप घेतला कारण आपल्या मुलांनी चांगले शिकावे, मोठा ऑफिसर व्हावे व घराण्याचे नाव उज्ज्वल करावे, या उद्देशाने मन घट्ट करून लेखकाच्या आई – वडिलांनी मुलांचा निरोप घेतला.

 

(आ) लेखकाला लहानपणी अनेक खेळाडू पाहण्याची संधी मिळाली, कारण ______

उत्तर: लेखकाला लहानपणी अनेक खेळाडू पाहण्याची संधी मिळाली कारण लेखकांचे चुलते वाय. एम.सी.ए. च्या कंपाऊंडमध्ये राहत असत. लेखकही शिक्षणासाठी काकांकडे राहत होते. त्या कम्पाऊंडमध्ये अनेक सभासद खेळण्यासाठी येत असत.

 

(इ) ‘आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन’ असे लेखकास वाटले, कारण ______

उत्तर: ‘आंधळा मागतो एक डोळा व देव देता दोन’ असे लेखकाला वाटले कारण लेखकाला क्रिकेट खेळ आवडू लागला होता. त्यांच्या कम्पाऊंडमध्ये सभासद खेळण्यासाठी येत त्यावेळी लेखकालाही चेंडू फेकण्यासाठी बोलावले जाई आणि लेखकाला हा खेळ आवडत असल्यामुळे तेही या कामासाठी तयार असत.

 

(ई) दुसऱ्या मुलांच्या हातांत खेळणी पाहून लेखकाला लहानपणी त्यांचा हेवा वाटत असे, कारण ______

उत्तर: दुसन्या मुलांच्या हातात खेळणी पाहून लेखकाला लहानपणी त्यांचा हेवा वाटत असे कारण तुटपुंज्या पगारात लेखकाचे वडील घरखर्च भागवत होते. त्यामुळे लेखकासाठी खेळणी विकत घेऊ शकत नव्हते.

(२) आकृती पूर्ण करा.

(अ)

IMG 20231029 164241 पाठ १४ – बीज पेरले गेले

उत्तर: 

IMG 20231029 164420 पाठ १४ – बीज पेरले गेले

(आ)

IMG 20231029 164255 पाठ १४ – बीज पेरले गेले

उत्तर: 

IMG 20231029 164444 पाठ १४ – बीज पेरले गेले

(३) ओघतक्ता तयार करा.

IMG 20231029 164307 पाठ १४ – बीज पेरले गेले

उत्तर: 

IMG 20231029 164502 पाठ १४ – बीज पेरले गेले

(४) खालील शब्दांसाठी पाठात आलेले समानार्थी शब्द शोधून लिहा.

(अ) सही 

उत्तर: स्वाक्षरी

 

(आ) निवास 

उत्तर: घर

 

(इ) क्रीडा 

उत्तर: खेळ

 

(ई) प्रशंसा

उत्तर: स्तुती

(५) खालील वाक्यांत कंसातील वाक्प्रचारांचा योग्य उपयोग करून वाक्ये पुन्हा लिहा.

(आनंद गगनात न मावणे, हेवा वाटणे, खूणगाठ बांधणे, नाव उज्ज्वल करणे)

 

(अ) मोठे झाल्यावर रुग्णांची सेवा करण्यासाठी मी नर्स होण्याचे मनाशी निश्चित केले.

उत्तर: मोठे झाल्यावर रुग्णांची सेवा करण्यासाठी मी नर्स होण्याची मनाशी खूणगाठ बांधली.

 

(आ) दारात अचानक मामा-मामींना बघून सर्वांना खूप आनंद झाला.

उत्तर: अचानक दारात मामा-मामींना बघून सगळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

 

(इ) आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कौस्तुभने बुद्धिबळ खेळात शाळेचे नाव उंचावले.

उत्तर: आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कौस्तुभने बुद्धिबळ खेळांत शाळेचे नाव उज्ज्वल केले.

 

(ई) मानसीने म्हटलेल्या गाण्याचे सर्वांनी केलेले कौतुक ऐकून मला क्षणभर तिचा मत्सर वाटला. 

उत्तर: मानसीने म्हटलेल्या गाण्याचे सर्वांनी केलेले कौतुक ऐकून माला क्षणभर तिचा हेवा वाटला.

(६) स्वमत.

(अ) लेखकाच्या वडिलांची शिस्त जाणवणारे प्रसंग पाठाच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर: वडिलांची बदली वडगावाला झाल्यावर लेखकाने त्यांच्या बरोबर जाण्याचा आग्रह धरला; परंतु त्यांनी मोठे व्हावे, ऑफिसर व्हावे हे वडिलांचे स्वप्न असल्यामुळे त्यांना काकांकडे राहावे लागले.

 

दुसरा प्रसंग लेखक मित्रांसोबत शाळा बुडवून मॅच बघण्यासाठी गेले. हे वडिलांना कळल्यावर त्यांच्याकडून संतापाने छड्या खात लेखकास शाळेत जाऊन बसावे लागले.

 

अशाप्रकारे अभ्यास व शाळा याबाबत वडील कडक स्वभावाचे होते हे जाणवते.

When his father was transferred to Vadgaon, the author insisted on accompanying him; but because it was his father’s dream that he should grow up and become an officer, he had to stay with his uncle.


On another occasion, the writer went to watch a match after skipping school with his friends. When his father came to know about this, the author had to go to school and sit in the school.

 

Thus it can be seen that the father was strict about studies and school.

(आ) तुमच्या मते लेखकाच्या मनात क्रिकेटचे बीज कसे रुजले असावे ते लिहा.

उत्तर: लेखक ज्यावेळी शिक्षणासाठी काकांकडे वाय. एम.सी.ए. कंपाऊंड मध्ये राहण्यास गेले, तेथे अनेक सभासद खेळण्यासाठी येत. त्यांच्या खेळाचे निरीक्षण करून, लेखकांना त्या खेळाची भुरळ पडली. तेव्हापासून ते शाळा सुटली ना सुटली की मैदानात खेळाडूंसोबत खेळायला मिळावे म्हणून लवकर येत असत. क्रिकेट खेळाडू होणे हे त्यांनी मनाशी पक्के केले. सतत सराव करणे, मॅच बघण्यास जाणे यासाठी ते प्रयत्नात असत.

 

अशाप्रकारे सभोवतालचा परिसर जो खेळासाठी प्रवृत्त करतो. यामध्ये सर्व खेळाडू, स्पर्धा यांचा प्रभाव लेखकाच्या मनात क्रिकेटचे बीज रुजण्यास प्रवृत्त करणारा होता.

When the author went to his uncle to live in the YMCA compound for education, many members used to come to play there. Observing their game, the authors became fascinated with the game. Since then, he used to come early to play with the players on the field, whether or not school was over. He made up his mind to become a cricketer. He used to try to practice continuously and go watch matches.

 

Thus, the surroundings encourage play. In this, the impact of all the players and the competition was what made the seed of cricket take root in the writer’s mind.

(इ) तुमच्या मते लेखकाच्या मनात पेरले गेलेले क्रिकेटचे बीज कसे उगवले ते लिहा.

उत्तर: लेखक जेव्हा शिक्षणासाठी काकांकडे राहत होते त्यावेळी क्रिकेट खेळ त्यांना आवडू लागला. ते वाय. एम. सी. ए. कंपाऊंड मध्ये सभासदांसोबत खेळत असत. त्यांच्या खेळाचे निरीक्षण करत, आपणही यांच्या सारखे खेळावे. एक क्रिकेट खेळाडू व्हावे असे त्यांनी मनाशी ठरवले.

 

मॅच पाहण्यासाठी ते मित्रांसोबत जात, त्यांच्यांशी क्रिकेटच्या खेळाच्या गप्पा मारत, इतकेच नव्हे तर वडिलांनीही त्यांचे खेळाचे वेड पाहून जुनी बॅट खरेदी करून दिली. तसंच आंतरशालेय स्पर्धेत १०० धावांचा विक्रम त्यांनी केला. अशाप्रकारे क्रिकेटचे बीज लेखकांत उगवले.

When the writer was staying with his uncle for his education, he started liking the game of cricket. They used to play with the members of the YMCA compound. Observing their game, we should play like them. He made up his mind to become a cricketer.

 

He used to go with his friends to watch the matches and chat with them about the game of cricket. Not only that, but his father also bought him an old bat after seeing his passion for the game. He also made a record of 100 runs in the inter-school competition. This is how the seed of cricket sprouted in writers.

(ई) प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांसंबंधी माहिती लिहा.

उत्तर: प्रतिकूल परिस्थिती म्हणजे ज्या परिस्थितीत कुठल्याही प्रकारचे सुखी, समाधानी जीवन प्राप्त न होणे. अनेक संकटांना सामोरे जात जीवन जगणे होय.

 

प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी धैर्य, जिद्द याची गरज असते जी गोष्ट पूर्ण करायची आहे, त्यासाठी सतत प्रयत्न करत राहणे, स्वतःचा आत्मविश्वास विकसित करणे, मेहनतीशिवाय यश नाही. त्यामुळे श्रमाला महत्त्व देणे. ध्येय निश्चित करून ते पूर्ण करण्याचा ध्यास घेणे या गोष्टींची आवश्यकता असते.

Adversity is the situation in which no happy, satisfied life can be achieved. To live life is to face many troubles.

 

Courage and determination to overcome adversity are needed to achieve something; keep striving for it and develop self-confidence. There is no success without hard work. Hence, giving importance to labor It requires setting goals and committing to them.

उपक्रम :

तुमच्या मनात रुजलेले बीज ओळखा व ते कसे उगवेल यासंबंधीचे विचार शब्दबद्ध करा.

उत्तर: विद्यार्थांनी हे स्वतः करावे.