पाठ ६ – टप् टप् पडती
कुरण – गवत, चराऊ जमीन
भरारा – भरभर झोपाळा झोका
खुळे – वेडे
White flowers of prajakta (the coral tree) are dropping on our body and we a together singing the chorus on that whirling rhythm. Sun and shade have knitted a beautiful net on the turf under the tree. When the wind flows swiftly, the grass tosses in joy.
The melodious tunes of our song go on flowing far off and bathe in the g goldes yellow sunshine. The whole earth is smiling sweetly and a swing is oscillating on the branches.
Our song is like gentle breeze and twinkling stars. Rain showers through our song, a breeze of wind emanates and charming plumage of peacock blooms through our song, The poet says my children, do bloom like flowers and live in harmony by singing your tunes together. Those who sing are sane and those who do not are foolish. (Hence go on singing ever.)
स्वाध्याय
प्र. १. खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
(अ) कवितेतील मुलांचे गाणे कधी जुळून येते ?
उत्तर: प्राजक्ताची फुले टप् टप् अंगावर पडू लागल्यावर त्या तालावर कवितेतील मुलांचे गाणे जुळून येते.
(आ) गवत खुशीने का डुलते ?
उत्तर: भरभर वारा आल्यामुळे गवत खुशीने डोलते.
(इ) मुलांच्या गाण्यातून काय काय फुलते ?
उत्तर: मुलांच्या गाण्यातून पाऊस, वारा व मोरपिसारा फुलतो.
(इ) कवितेत खुळे कोणाला म्हटले आहे ?
उत्तर: जे गाणे गाणार नाहीत त्यांना खुळे म्हटले आहे.
प्र. २. कवितेच्या खालील ओळी पूर्ण करा.
(अ) कुरणावरती, ______
उत्तर: झाडाखाली ऊनसावली विणते जाळी
(आ) हसते धरती, ______
उत्तर: फांदीवरती हा झोपाळा झुले !
(इ) पाऊस, वारा, ______
उत्तर: मोरपिसारा या गाण्यातुन फुले !
खेळूया शब्दांशी.
(अ) ‘टप् टप्’ या शब्दाप्रमाणे कवितेत आलेले इतर नादानुकारी शब्द लिहा.
उत्तर: भिर् भिर्, झुळझुळ
(आ) खाली दिलेल्या ‘अ’ गट व ‘ब’ गट यांमधील शब्दांचा योग्य सहसंबंध लावा.

उत्तर:
हसरी – धरती
झुळझुळ – वारा
लुकलुक – तारा
फांदी – झोपाळा
(इ) खालील शब्दांत लपलेले शब्द लिहा.
उदा., मोरपिसारा – मोर, पिसारा, पिसा, सार, सारा. –
(१) कुरणावरती
उत्तर: वर, तीर, कुणावर, रती
(२) झाडाखाली
उत्तर: खाली झाली, खाडा, झाडा
(३) ऊनसावली
उत्तर: ऊन, सावली, साव, लीन, साली, नऊ, वसा, वन
(ई) खाली दिलेल्या पिवळ्या चौकोनातील शब्दांना हिरव्या चौकोनात दिलेले विरुद्ध अर्थाचे शब्द शोधा व लिहा.
उदा., बरे × वाईट

उत्तर:
आनंद × दुःख
शुभ × अशुभ
यश × अपयश
नफा × तोटा
चढ × उतार
लहान × मोठे
आत × बाहेर
शब्दकोडे सोडवूया.
खालील वाक्यॉगर याचा त्याप्रमाणे दिलेल्या शब्दाचा डोंगर बनवा


उत्तर:

माहिती मिळवूया.
फुलांना रंग कशामुळे प्राप्त होतो ?
फुलांमध्ये दोन प्रकारची रंगद्रव्ये असतात. हरितद्रव्ये, कॅरोटिन यांमुळे नारिंगी, पिवळा, हिरवा हे रंग फुलांच्या पाकळ्यांना मिळतात. लाल, गुलाबी, निळा वगैरे रंग फुलांमधील अँथोसायनीन या रंगद्रव्यामुळे मिळतात. ही रंगद्रव्ये पाण्यात विरघळू शकतात. ज्या वेळी फुलांना जीवनरसाचा पुरवठा होतो, त्या वेळी त्यात ही रंगद्रव्ये विरघळतात.
कोणत्या फुलांत कोणती रंगद्रव्ये असावीत, हे त्यांतील गुणसूत्रे ठरवतात आणि गुणसूत्रे आनुवंशिक असल्यामुळे त्या त्या फुलांचा रंग ठरावीकच असतो, तो बदलत नाही.
वाचा.
रंगीबेरंगी फुलांचे ताटवे पाहिले, की मन कसे प्रसन्न होऊन जाते. आपल्या सभोवती उमललेल्या फुलांच्या सुवासाने आजूबाजूचे वातावरण सुगंधित होते. त्या नाजूक, टवटवीत, गंधमिश्रित फुलांच्या दर्शनाने नयनसुख मिळते. आज उमललेले फूल उया कोमेजून जाणार असते; पण त्याच्या या क्षणभंगुर जीवनासाठी फुलाला कधी रडताना पाहिले आहे का तुम्ही ? दुसऱ्याला प्रफुल्लित करत, सुवास देत ते हसत-बागडत राहते. ते आपल्याला असे तर सांगत नसेल ना, की ‘मुलांनो, आजचा दिवस आपला आहे. या दिवशी आनंदाने हसा, खेळा, बागडा. दुसऱ्यांना आनंद, सुख-समाधान देण्यातच खरा आनंद दडला आहे.’