Maharashtra Board Textbook Solutions for Standard Six

पाठ १६ – मुक्या प्राण्यांची कैफियत

In this skit (short play), all animals have expressed their grievances about the irresponsible or careless behaviour of human beings. Humans have been destroying Nature by polluting the environment recklessly. Hence the animals are giving valuable advice to them to protect the environment before it is too late.

कैफियत – तक्रार

कासावीस होणे – व्याकूळ होणे

डोळे पाणावणे – दु:ख होणे, रडू येणे

पोटशूळ उठणे – पोट दुखणे

जलचर – पाण्यात राहणारे प्राणी

डोळे उघडणे – जागरूक होणे, सावधान होणे

सगेसोयरे – नातेवाईक

ऱ्हास – नष्ट 

दूषण देणे – दोष देणे

स्मरण – आठवण

वनचरे – वनात राहणारे प्राणी.

स्‍वाध्याय

प्र. १. तक्रार व वनचर यांच्या माध्यमातून जोड्या पूर्ण करा.

                  तक्रार

(१) मोबाईलच्या आवाजाची भीती

(२) प्लॅस्टिक सेवनाने पोटदुखी

(३) ____________

(४) वारूळ, शेत नष्ट

वनचर

चिमणी

______

मासोळी

______

उत्तर: 

                  तक्रार

(१) मोबाईलच्या आवाजाची भीती

(२) प्लॅस्टिक सेवनाने पोटदुखी

(३) विषारी जलाने जीवाची तगमग

(४) वारूळ, शेत नष्ट

वनचर

चिमणी

गाय

मासोळी

नाग

प्र. २. एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.

(अ) या पाठात कोणाकोणांत संवाद झालेला आहे?

उत्तर: या पाठात चिमणी, गाय, मासोळी, सर्व प्राणी व माणूस यात संवाद झालेला आहे.

 

(आ) चिमणीला कोणता त्रास होतो?

उत्तर: चिमणीला मोबाईलच्या आवाजाचा त्रास होतो.

 

(इ) गाईचे डोळे का पाणावले?

उत्तर: घासाबरोबर पोटात प्लॅस्टिक जाते म्हणून गाईचे पोटशूळ उठते त्यामुळे तिचे डोळे पाणावले.

 

(ई) मासोळीने आपली कोणती समस्या मांडली आहे? 

उत्तर: तलावातील जल विषारी झाले आहे त्यामुळे तिच्या जिवाची तगमग होते. अशी मासोळीने आपली समस्या मांडली आहे.

 

(उ) नागोबाची तक्रार कोणती आहे?

उत्तर: वारूळ नाही, शेती नाही त्याला पकडून लाच्या देतात या अंधश्रद्धेबद्दल नागोबाची तक्रार आहे.

प्र. ३. घोटभर, मैलभर, तासभर, कणभर, चमचाभर हे शब्द वापरून वाक्ये लिहा.

उत्तर: 

घोटभर – भर उन्हात चालता चालता घोटभर पाणी हवेच.

मैलभर – खेड्यातील मुलांना मैलभर चालून शाळेत जावे लागते.

तासभर – बंडूने तासभर अभ्यास करावा.

कणभर – दोन्ही खडे सुंदरच होते पण निळा कणभर जरा जास्त चमकत होता.

चमचाभर – आईने बाळाला चमचाभर औषध पाजले.

प्र. ४. कोण ते सांगा (वनचर, भूचर, जलचर, उभयचर)

(१) पाण्यात राहणारे

उत्तर: जलचर

 

(२) जमिनीवर राहणारे 

उत्तर: भूचर

 

(३) जंगलात राहणारे

उत्तर: वनचर

 

(४) जमीन व पाणी या दोन्ही ठिकाणी राहणारे

उत्तर: उभयचर

प्र. ५. खालील शब्दांचे समानार्थी शब्द पाठातून शोधून लिहा.

(१) किनारा –

उत्तर: काठ

 

(२) शेवट – 

उत्तर: ऱ्हास 

 

(३) जल –  

उत्तर: पाणी

 

(४) आठवण –

उत्तर: स्मरण

 

(५) मासा –

उत्तर: मासोळी 

 

(६) नातेवाईक –

उत्तर: सगेसोयरे

प्र. ६. खालील शब्दांचे अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.

सगेसोयरे, पाहुणे, नातेवाईक, भाऊबंद

प्र. ७. खालील शब्दांचे लिंग बदला.

(१) चिमणी – 

उत्तर: चिमणा

 

(२) नाग – 

उत्तर: नागीण

 

(३) वाघ –

उत्तर: वाघीण

प्र. ८. खालील वाक्यांत कंसातील योग्य वाक्प्रचार घाला.

(उदास दिसणे, कासावीस होणे, डोळे पाणावणे, डोळे उघडणे.)

(अ) सह्याद्री डोंगर चढताना आमचा जीव पाणी पिण्यासाठी _____ होत होता.

उत्तर: कासावीस 

 

(आ) आवडते पेन हरवल्याने संजय आज _____ होता.

उत्तर: उदास दिसत

 

(इ) पाणीटंचाई भासू लागताच पाणी बचतीबाबत सर्वांचे _____ उघडले.

उत्तर: डोळे

 

(ई) रस्त्यावर घडलेला अपघात बघून सर्वांचे _____.

उत्तर: डोळे पाणावले.

प्र. ९. धडधड, तगमग यासारखे आणखी शब्द लिहा.

उत्तर:

(१) सरसर

(२) भरभर

(३) झरझर

(४) पटपट

(५) सळसळ 

(६) टकमक

(७) दगदग

(८) बडबड

खालील चौकटीत काही प्राणी व काही पक्ष्यांची नावे लपलेली आहेत. ते शोधा व त्यांची नावे लिहा.

उदा., वटवाघूळ

IMG 20231013 210145 पाठ १६ – मुक्या प्राण्यांची कैफियत

उत्तर:

प्राणी: सिंह, वाघ, गवा, गेंडा, जिराफ, हत्ती, काळवीट, लाडंगा, उंट, कोल्हा, ससा, घूस

 

पक्षी: बदक, बगळा, कावळा, कबुतर, कोकिळा, टिटवी, मोर, वटवाघूळ

दवाखान्याच्या ठिकाणी लावलेल्या पाट्या वाचा. त्या पाट्यांमध्ये आपल्याला सूचना दिलेल्या असतात. या सूचनांव्यतिरिक्त आणखी काही सूचनांच्या पाट्या तुम्ही तयार करा.

IMG 20231013 210158 पाठ १६ – मुक्या प्राण्यांची कैफियत

वरीलप्रमाणे शाळेच्या परिसरात स्वच्छताविषयक पाट्या लावायच्या आहेत, तर तुम्ही कोणत्या पाट्या तयार कराल.

IMG 20231013 210212 पाठ १६ – मुक्या प्राण्यांची कैफियत

उत्तर: 

IMG 20231013 211023 पाठ १६ – मुक्या प्राण्यांची कैफियत

‘पर्यावरण संरक्षण’ याविषयी पाठाच्या शेवटी माणसाने केलेली प्रतिज्ञा तुमच्या शब्दांत लिहा.

IMG 20231013 210226 पाठ १६ – मुक्या प्राण्यांची कैफियत

उत्तर: 

IMG 20231013 211518 पाठ १६ – मुक्या प्राण्यांची कैफियत

वाचा. समजून घ्या.

IMG 20231013 210242 पाठ १६ – मुक्या प्राण्यांची कैफियत

आपण समजून घेऊया

खालील वाक्यांतील अधोरेखित शब्द पाहा.

१. ही माझी छत्री आहे.

२. तू कोणाचा मुलगा आहेस?

३. मी कालच गावाहून आलो.

४. जी वेगाने पळेल, ती जिंकेल.

 

अधाेरेखित केलेले शब्द ‘एकाक्षरी’ शब्द आहेत. एकाक्षरी शब्दांना द्यायची वेलांटी किंवा उ-कार नेहमी  दीर्घलिहितात. या नियमाला फक्त ‘नि’ हा शब्द अपवाद आहे. 

 

खालील शब्दांपासून वाक्ये बनवा.

१. ती – 

उत्तर: ती माझी बहीण आहे.

 

२. पी – 

उत्तर: चिमणी, चिमणी ये ये, दाणे खा, पाणी पी.

 

३. मी – 

उत्तर: मी लवकर उठतो.

 

४. ही –

उत्तर: ही माझी शाळा आहे.

 

खालील शब्द वाचा. शब्दांतील शेवटच्या अक्षराला दिलेली वेलांटी, उ-कार समजून घ्या.

चिमणी, विळी, मिरची, कढई, चटई, सफाई, खिडकी, मागू, चिकू, पेरू, नाचू, वस्तू, गाऊ, शिंगरू, कांगारू, ताई, समई, पाहुणी, पाणी.

 

मराठी भाषेत शब्दांतील शेवटच्या अक्षराला द्यायची वेलांटी किंवा उ-कार नेहमी दीर्घलिहितात. या नियमाला ‘आणि’, ‘परंतु’ हे शब्द अपवाद आहेत.