पाठ ६ – हे खरे खरे व्हावे…
The poetess says: I always feel in my mind that I rise up in the air and wander in the sky—to be a bird and travel leisurely. Then, at the crack of dawn, come down as a dewdrop to settle on the grasses gently and vanish again in the air like water vapour with the coming of sunlight.
Sometimes I want to turn into the dark colours of the horizon, or I wish to become a cloud and float in the sky. Occasionally, I also want to be like a gusty wind and play around with the moon.
Sometimes I want to descend on the earth, transform into a mist, and spread out playfully over the whole place. At times, I wish I could see the sun, which gives us so much warmth, very closely. I also want to penetrate through the darkness like a ray of the sun.
Every so often, I want to blend myself into the amazing colours of this world. And remember, this is not just an illusion; I want it to happen in reality.
स्वार होणे – आरूढ होणे, बसणे
विहरणे – आकाशात उडणे, फिरणे
क्षितिज – आकाश जेथे जमिनीला टेकल्यासारखा भास होतो ते ठिकाण
भरारणारा – वेगाने वाहणारा
अलगद – हळूच
मिष्कील – खोडकर
स्रोत – ज्यापासून मिळते तो मार्ग
काळोखाला चिरणे – काळोख भेदून जाणे
भास – भ्रम
स्वाध्याय
प्र. १. एक-दोन शब्दांत उत्तरे लिहा.
(अ) कवयित्रीला अवकाशात कसे फिरावेसे वाटते?
उत्तर: आपण पक्षी होऊन हवेवर आरूढ व्हावे व आकाशात स्वैरपणे विहार करावा असे कवयित्रीला वाटते.
(आ) कवयित्रीला गवतावर कसे उतरावेसे वाटते?
उत्तर: आपण दवबिंदू होऊन भल्या पहाटे गवताच्या पात्यावर उतरावे असे कवयित्रीला वाटते.
(इ) धुके बनून कवयित्रीला काय करावेसे वाटते?
उत्तर: धुके बनून अलगदपणे धरणीवर उतरून धुक्याच्या चादरीने संपूर्ण जग झाकून अशा जगाकडे खोडकरपणे पाहावे असे कवयित्रीला वाटते.
(ई) कवयित्रीला सूर्यकिरण का व्हावेसे वाटते?
उत्तर: कवयित्रीला सूर्यकिरण व्हावेसे वाटते कारण तिला काळोखाला भेदून जायचे आहे.
प्र. २. खालील कल्पनेचा योग्य अर्थ शोधा.
(अ) सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे.
(१) सूर्यकिरणांची वाफ व्हावी.
(२) सूर्याच्या उष्णतेने वाफ बनावी.
(३) सूर्याच्या उष्णतेने वाफ बनून पुन्हा दवबिंदू बनावा.
उत्तर: पर्याय (३) – सूर्याच्या उष्णतेने वाफ बनून पुन्हा दवबिंदू बनावा.
(आ) भास नको मज, तुम्हा सांगतो हे खरे खरे व्हावे.
(१) निसर्गातल्या रंगात रंगून जावे.
(२) वर्णन केलेल्या कल्पना प्रत्यक्षात याव्यात.
(३) कोणतीच गोष्ट भासमान नसावी.
उत्तर: पर्याय (१) – निसर्गातल्या रंगात रंगून जावे.
प्र. ३. कवितेतून शोधा.
उदा., चंद्राशी खेळणारा – भरारणारा वारा
(अ) अवकाशी विहरणारा –
उत्तर: पक्षी
(आ) गवतावर उतरणारे –
उत्तर: दवबिंदू
(इ) धरणीवर उतरणारे –
उत्तर: धुके
(ई) ऊर्जेचा स्रोत असणारा –
उत्तर: सूर्य
(उ) काळोखाला चिरणारा –
उत्तर: सूर्यकिरण
प्र. ४. ‘खरे-खोटे’ याप्रमाणे काही विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लिहा.
उत्तर:
काळोख × उजेड
उतरावे × चढावे
गडद × विरळ
जवळून × दुरून
प्र. ५. ‘मी झाड झाले तर…’ अशी कल्पना करून पाच ते सहा वाक्ये लिहा.
उत्तर: मी झाड झालो तर एका जागी उभा राहून सर्वांची गंमत पाहीन. सर्वांना गार सावली देईन. थकलेले सर्वजण माझ्या सावलीत विसावा घेतील. माझी गोड गोड फळे सर्वांना आवडतील. पक्षी माझ्याकडे आसऱ्याला येतील. माझ्या फांदयांवर आपली घरटी बांधतील. त्यांच्या किलबिलाटाने आजूबाजूचा परिसर दुमदुमून जाईल.
प्र. ६. हे शब्द असेच लिहा.
क्षितिज, ऊर्जा, मिष्किल, स्रोत, स्वार, सूर्यप्रकाश, चंद्र, निसर्ग, पुन्हा.
प्र. ७. ‘झुळूक मी व्हावे’ कवी दा.अ. कारे यांची कविता मिळवून, त्या कवितेचे वर्गात वाचन करा.
उत्तर:
‘झुळूक मी व्हावे’
– दामोदर अच्युत कारे
वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे
घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे
कधि बाजारी तर कधि नदीच्या काठी
राईंत कधी वा पडक्या वाड्यापाठी
हळू थबकत जावें कधि कानोसा घेत
कधि रमत गमत वा कधि भरारी थेट
लावून अंगुली कलिकेला हळुवार
ती फुलुनी बघे तो व्हावे पार पसार
परी जाता जाता सुगंध संगे न्यावा
तो दशदिशांतुनी फिरतां उधळुनि द्यावा
गाण्याची चुकलिमुकली गॉड लकेर
झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर
शेतांत पाचूच्या, निळ्या नदीवर शांत
खुलवीत मखमली तरंग जावें गात
वेळूच्या कुंजी वाजवूनी अलगूज
कणसांच्या कानीं सांगावे हितगुज
शिंपावी डोहीं फुलें बकुळीची सारी
गाळून जांभळे पिकली भुलभुल तीरीं
दिनभरी राबुनी दमला दिसतां कोणी
टवटवी मुखावर आणावी बिलगोनी
स्वच्छंद अशा या करुनि नाना मौजा
घ्यावया विसावा यावें मी तिनिसांजा
प्र. ८. ढगांचे विविध आकार काढा. त्यांना रंग द्या व त्यांत कवितेचे एकेक कडवे सुंदर अक्षरांत लिहा.
उत्तर: विद्यार्थ्यांनी हे स्वतः करावे.
प्र. ९. कवयित्रीला जशी अनेक रूपे घ्यावीशी वाटतात, तसे तुम्हांला कोण कोण व्हावेसे वाटते ते लिहा.
उत्तर: कवयित्रीप्रमाणे मला नदी होऊन सतत पुढे धावत राहावे, फुलपाखरू होऊन फुलांवर बागडावे, चंद्र होऊन शीतल प्रकाशाने आकाशात विहरावे, पर्वत होऊन सर्वावर जरा लक्ष ठेवावे असे वाटते.
प्र. १०. खालील चित्र पाहा. चित्राचे वर्णन करा.
उत्तर: निसर्गाचे सुंदर रूप दाखविणारे हे चित्र आहे. सूर्योदयाची वेळ आहे. अनेक डोंगर दिसत आहेत. डोंगराआडून सूर्य उगवला आहे. एक लहानसे घर आहे. घराच्या पाठीमागे एक झाड आहे. अतिशय सुंदर असा देखावा चित्रात दिसत आहे. चित्र मनाला मोहून टाकणारे आहे.
प्र. ११. खालील वेळेला सूर्याचा रंग कसा दिसतो त्याचे निरीक्षण करा. लिहा.
उत्तर:
उपक्रम : तुमच्या कल्पनेने या कवितेचे वर्णन करणारे निसर्गचित्र काढा व रंगवा.
उत्तर: विद्यार्थ्यांनी हे स्वतः करावे.
खालील वाक्यांत कंसातील योग्य सर्वनामे घाला.
(आपण, ती, त्यांनी, स्वतः)
(अ) हसिना खेळाडू आहे. ______ रोज पटांगणावर खेळते.
उत्तर: ती
(आ) बाईंनी मुलांना खाऊ वाटला. ______ मुलांशी गप्पा मारल्या.
उत्तर: त्यांनी
(इ) घरातील सगळे म्हणाले, ‘______ सिनेमाला जाऊ.’
उत्तर: आपण
(ई) जॉनने ______ चहा केला.
उत्तर: स्वतः
खालील वाक्यांतील रिकाम्या जागी कंसातील योग्य सर्वनामे लिहा.
(अ) ______ गावाला जा. (तुम्ही, आपण, आम्ही)
उत्तर: तुम्ही
(आ) आईने ______ डबा भरून दिला. (त्याने, तिचा, आपण)
उत्तर: तिचा
(इ) आज ______ खूप मजा केली. (ती, स्वतः, आम्ही)
उत्तर: आम्ही
(ई) दादा धावपटू आहे. ______ रोज पळतो. (तो, ती, त्या)
उत्तर: तो
(उ) ______ बाळाला मांडीवर घेतले. (तिला, तिने, तिचा)
उत्तर: तिने
(ऊ) मोत्याने धावत येऊन ______ स्वागत केले. (आम्हांला, आपण, आमचे)
उत्तर: आमचे