पाठ २८ – फुलपाखरू आणि मधमाशी
शब्दार्थ
स्वच्छंदपणे – मनात येईल तसे
दरवळणे – पसरणे
मग्न असणे – पूर्णपणे रमून जाणे
स्वाध्याय
प्र. १. कोण ते लिहा.
(अ) बागेत स्वच्छंदपणे फिरणारे.
उत्तर: फुलपाखरू
(आ) कामात मग्न असणारी.
उत्तर: मधमाशी
(इ) थुईथुई नाचणारे.
उत्तर: कारंजे
प्र. ३. तुम्हांला काय काय पाहिल्यानंतर आनंद होतो ?
उत्तर: सूर्योदय, सूर्यास्त, खळखळ वाहणारी नदी, हिरवे निळे डोंगर, रंगीबेरंगी फुले, फुलपाखरे, चिमुकले शुभ्र झरे निसर्गातल्या अशा अनेक गोष्टी पाहिल्यानंतर आनंद होतो.
प्र. ४. एक, मध यांसारखे पाठात आलेले शब्द लिहा. (बाराखडीतील एकही चिन्ह नसलेले शब्द)
उत्तर: बघ, पण, मन, तर, धन, इ.
प्र. ५. खालील शब्दांना ‘दार’ शब्द जोडा. नवीन शब्द तयार करा.
उदा., पेट – ऐटदार
चमक
उत्तर: चमकदार
दुकान
उत्तर: दुकानदार
माल
उत्तर: मालदार
चोप
उत्तर: चोपदार
भाल
उत्तर: भालदार
खास
उत्तर: खासदार
आम
उत्तर: आमदार
गमती
उत्तर: गमतीदार
रुबाब
उत्तर: रुबाबदार
वजन
उत्तर: वजनदार
प्र. ६. खालील शब्दांना ‘पणा शब्द जोडून नवीन शब्द बनले आहेत. वाचा शब्द वापरून वाक्ये लिहा.
चांगुलपणा
उत्तर: रामरावांचा चांगुलपणा साच्या गावाला माहीत होता.
मोठेपणा
उत्तर: काही लोकांना उगाचच मोठेपणा करायची सवय असते.
लहानपणा
उत्तर: संत तुकारामांनी देवाकडे लहानपणा मागितला आहे.
वेगळेपणा
उत्तर: सगळ्या मुलांत त्याचा वेगळेपणा उठून दिसत होता.
मोकळेपणा
उत्तर: शेजारच्या काकू नसल्या की आमच्या खेळण्यात मोकळेपणा येतो.
सोपेपणा
उत्तर: प्रश्नांचा सोपेपणा बघून आम्ही मुले खुश झालो.
कठीणपणा
उत्तर: त्यांच्या साध्या साध्या प्रश्नांमध्येपण कठीणपणा होता.
उपक्रम –
१. फुलपाखरांविषयीच्या कविता मिळवा. वर्गात म्हणून दाखवा.
उत्तर:
भिरभिरले हे मनं
फुलपाखरू होऊनं,
कुणाच्या शोधातं
न कळे आतलें आत
फुलपाखरू शोधतयां फुलं
गंध चाखायला
मन झाले हे बावरे
गुंतुन पडायला
ध्यास लागलियां फुलां
फुलपाखरू येईलं
माझ्याकडे बघुन नजरेने
चुंबन घेईलं
नजरेने त्याच्या सोडलायं बाण
हृद्याला माझ्या टाकलयं चिरुन
रोज-रोज नजरेची लागली चाहुल
मन ही माझे गेलियां भुलुन
एकेदिवशी अचानक तोडले ते फुलं
फुलपाखरू बिचारे अजुनी घिरट्या घेतयं
आहे आस धरुनी अजुन
येईलं माझी फुलराणी मजं भेटायला आज
– कोमल जगताप
२. फुलपाखरांची चित्रे मिळवा. वहीत चिकटवा.
उत्तर:
वाचा, लक्षात ठेवा.
फुलपाखरे नाजूक असतात. त्यांना पकडू नका. इजा करू नका.
ओळखा पाहू
उंचाडी मान, फताडे पाय,
बाळवंटात डुगडुग जाय.
उत्तर: जिराफ
कुंडीवरील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द पानांवर आहेत. योग्य जोड्या जुळया व लिहा.
उत्तर:
एक × अनेक
जिंकणे × हारणे
वर × खाली
लहान × मोठा
प्रश्न × उत्तर
गडद × फिकट
खालील दोन फुलांवरील शब्दाचे मिळून योग्य जोडशब्द तयार करा व पिशवीवर लिहा.
उदा., गोरगरीब
उत्तर: पुरणपोळी, गोडधोड खाऊनपिऊन, इकडेतिकडे, कामधाम