पाठ २७ – महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
शब्दार्थ
अवधा – फक्त
महाभयंकर – अतिशय त्रासदायक
दुष्काळ – पाण्याची व अन्नधान्याची कमतरता असणे
दानशूर – धान्य, पैसे, कपडे मोठ्या प्रमाणात दान करणारी व्यक्ती
कट्टा – घरासमोरचा ओटा
स्वाध्याय
प्र. १. एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) विठ्ठलचा जन्म कोठे झाला ?
उत्तर: विठ्ठलचा जन्म जमखंडी गावी झाला.
(आ) विठ्ठल कोणकोणते खेळ खेळत असे?
उत्तर: विठ्ठल हुतुतू, खो-खो, सुरपारंब्या यांसारखे खेळ खेळत असे.
(इ) विठ्ठलच्या आजोबांनी दुष्काळाच्या वेळी गोरगरिबांना कोणती मदत केली?
उत्तर: विठ्ठलच्या आजोबांनी दुष्काळाच्या वेळी गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटून मदत केली.
(ई) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर कोणते कार्य केले?
उत्तर: महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर समाजसुधारणेचे कार्य केले.
प्र. २. योग्य पर्यायापुढे अशी खूण करा.
(१) गोरगरीब लोक विठ्ठलला आशीर्वाद देत असत, कारण …….
(अ) तो वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत असे.
(आ) तो आजोबांबरोबर गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटत असे.
उत्तर: पर्याय (आ) – तो आजोबांबरोबर गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटत असे.
(२) जेवताना एके दिवशी भिकारी दाराशी आला, तेव्हा –
(अ) विठ्ठलने जेवणाचे ताटच त्या भुकेलेल्या माणसाला दिले.
(आ) भुकेलेल्या माणसाला निघून जायला सांगितले.
उत्तर: पर्याय (अ) – विठ्ठलने जेवणाचे ताटच त्या भुकेलेल्या माणसाला दिले.
प्र. ३. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
(अ) जन्म ×
उत्तर: मृत्यू
(आ) आवड ×
उत्तर: नावड
प्र. ४. कंसात दिलेल्या शब्दांचे विरुद्ध अर्थ असलेले शब्द वापरून खालील वाक्ये पूर्ण करा.
(अ) डोंगर पर्वतापेक्षा _____ आहे. (मोठा)
उत्तर: डोंगर पर्वतापेक्षा लहान आहे.
(आ) हरवलेला चेंडू सापडल्याने मला खूप _____ झाला. (दुःख)
उत्तर: हरवलेला चेंडू सापडल्याने मला खूप आनंद झाला.
(इ) ससा हा प्राणी _____ असतो. (धीट)
उत्तर: ससा हा प्राणी भित्रा असतो.
(ई) राजूला _____ कपडे आवडत नाहीत. (सैल)
उत्तर: राजूला घट्ट कपडे आवडत नाहीत.
(उ) वीणा _____ चालते. (भरभर)
उत्तर: वीणा सावकाश चालते.
प्र. ५. खालील शब्द याचा य असेच लिहा.
विठ्ठल, अण्णासाहेब, हुतुतू, धार्मिक, संस्कार, दुष्काळ, महर्षी, ध्यास, आयुष्यभर हृदय
प्र. ६. तुमच्या परिसरात एखादी दानशूर व्यक्ती राहते का? ती व्यक्ती संकटाच्या वेळी इतरांना कोणती मदत करते, याची माहिती मिळवा. वर्गात सांगा.
उत्तर: हो, आमच्या बाजूच्या इमारतीत दामोदर काका राहतात. ते सेवानिवृत्त आहेत. ते नेहमीच अनेक लोकांच्या संकटाच्या काळात मदतीला धावून येतात. गरजू मुलांना ते वया-पुस्तके देतात. एखादया विदयार्थ्यांला शाळेची किंवा क्लासची फी भरणे शक्य नसेल तर त्याची फोसुद्धा ते देतात कारण पैशाअभावी त्याचे शिक्षण थांबू नये असे त्यांना वाटते. एखादया आजारी व्यक्तीकडे औषधांसाठी पैसे नसतील तर ते त्यांनाही मदत करतात. आता कोरोनाच्या संकटकाळात आमच्या इमारतीतील अनेक लोकांच्या नोकल्या गेल्या. काही लोकांना पुरेसे. वेतनही मिळाले नाही अशा वेळी त्यांच्या कुटुंबांना अन्नधान्यासारख्या जीवनावश्यक वस्तूंची मदतही त्यांनी केली. चांगल्या कार्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. स्वत:साठी जगण्यापेक्षा दुसऱ्यांसाठी जगा असे त्यांचे तत्त्व आहे.
खाली दिलेलं वाक्य वाचा व दिलेल्या चाररेषांमध्ये वळणदार अक्षरांत लिहा.
लहानग्या विठ्ठलला खेळाची अत्यंत आवड होती.