Maharashtra Board Textbook Solutions for Standard Five

पाठ १७ – आमची सहल

स्वाध्याय

प्र. १. एका वाक्यात उत्तरे लिहा.

(अ) मुलांची सहल कोठे गेली होती?

उत्तर: मुलांची सहल गावच्या आमराईमध्ये गेली होती.

 

(आ) सहलीला जाताना मुलांनी काय काय सोबत नेले होते?

उत्तर: सहलीला जाताना मुलांनी जेवणाचे डबे, पाण्याच्या बाटल्या व चित्रकलेचे साहित्य सोबत नेले होते.

 

(इ) बाईंनी आमराईचा अर्थ काय सांगितला? 

उत्तर: जिथे आंब्याची अनेक झाडे लावून ती जोपासलेली असतात, अशा आंब्यांच्या दाट झाडीला आमराई म्हणतात.

 

(ई) आमराईमध्ये मुले कोणते खेळ खेळली?

उत्तर: आमराईमध्ये मुले लपाछपी, शिवणापाणी, ऊनसावली हे खेळ खेळली.

प्र. २. साली शिवणी यांसारखे तुम्ही कोणकोणते खेळ खेळता त्यांची माहिती सांगा.

उत्तर: लपाछपी, आंधळी कोशिंबीर, तळ्यात मळ्यात, डोंगरपाणी इत्यादी.

प्र. ३. तुमच्या घरी धाव फेरीपासून कोणकोणते पदार्थ लिहा. 

उत्तर: आमच्या घरी आंब्यापासून आंबापोळी, आमरस, आंबा बर्फी, आंबा चॉकलेट तर कैरीपासून कैरी पन्हे, कैरीचे लोणचे, मुरांबा इत्यादी पदार्थ बनवतात.

प्र. ४. तुम्ही सहलीसाठी गेलेल्या ठिकाणाचे वर्णन वर्गात सांगा.

उत्तर: 

आमची सहल

सहल सर्वांनाच आवडते. दरवर्षी आमच्या शाळेची सहल कोठे न कोठे जात असते. यावर्षी आमची सहल नेहरू विज्ञान केंद्र, वरळी येथे जाण्याचे ठरले. सहलीच्या दिवशी सर्व विद्यार्थी डबा घेऊन सकाळी ७.३० वाजता शाळेत जमले. सहलीला इयत्ता ५ वी चे सर्व विद्यार्थी, ६ शिक्षक व ४ शिपाईही आले होते. बसने नेहरू विज्ञान केंद्राच्या मोठ्या परिसरात आम्ही पोहोचलो. येथे उजव्या बाजूला उद्यान आहे तर डाव्या बाजूला रेल्वेचे वाफेचे इंजिन आहे तसेच हवाई दलाचे विमान आहे. विविध शास्त्रज्ञांचे अर्धपुतळे आहेत. प्रत्येक मजल्यावर वेगवेगळे हॉल होते. एका दालनात तारांगण, आकाशदर्शन असे शो आम्हांला पहायला मिळाले. एका हॉलमध्ये मानवी शरीररचना ही फिल्म आम्हांला दाखवली त्यामुळे आम्हांला खूप माहिती मिळाली. दुसन्या मजल्यावरील हॉलमध्ये ३ D शो होता. विशिष्ट प्रकारचा चष्मा घालून हा शी पहावा लागला, वेगवेगळ्या सरपटणाऱ्या प्राण्यांची माहिती या फिल्ममधून आम्हांला मिळाली. दुसरा शो पाहताना तर खूप धमाल आली. येथे खुर्चीला टेकून बसल्यावर आम्ही आडवेच झालो. डोक्यावर सुरू झालेली फिल्म पाहू लागलो. ही फिल्म पाहताना प्रत्येक ठिकाणी आपणच आहोत असे वाटत होते. बर्फाळ शिखरांची माहिती येथे देण्यात आली. संध्याकाळी सर्व विद्यार्थी विज्ञान केंद्र पाहून बाहेर पडलो. विज्ञानाची खूप माहिती आम्हांला मिळाली होती. गाणी म्हणत, धमाल करत बस कधी शाळेत आली समजलेच नाही.

वाचा व लिहा.

झाडे, वेली लावू चला, स्वच्छ हवा मिळेल आपल्याला.

झाडांची घेता काळजी, फुले, फळे मिळतील ताजी.

झाडेच झाडे लावू आपण, तरच कमी होईल प्रदूषण.

खाली दिलेली वाक्ये वाचा व दिलेल्या चाररपामध्ये वळणदार अक्षरांत लिहा.

आमची सहल गावच्या आमराईमध्ये गेली होती.

 

वाऱ्याने पडलेल्या कैऱ्या आम्ही गोळा केल्या.

 

झाडांवर पक्ष्यांचा किलबिलाट चालला होता.