Maharashtra Board Textbook Solutions for Standard Five

पाठ १५ – नदीचे गाणे

ऐका. वाचा.

दरीदरीतून वनावनांतुन, 

झुळझुळ मी वाहत येते, 

मी मंजुळ गाणे गाते, 

मी पुढेच धावत जाते.

 

वसली गावे तीरावरती,

त्यांना भेटुनि जाते पुढती, 

लतावृक्ष किती काठावरती, 

भूमितुनी जे मला भेटती.

 

फुलवेली मज सुमने देती, 

कुठे लव्हाळी खेळत बसती,

कुठे आम्रतरू माझ्यावरती, 

शीतल अपुली छाया धरती.

 

पाणी पिउनी पक्षी जाती, 

घट भरुनी कोणी जल नेती, 

गुरे-वासरे जवळी येती, 

मुले खेळती लाटांवरती.

 

मी कोणाची – मी सर्वांची, 

बांधुनिही मज नेणाऱ्यांची! 

जेथे जाईन – तेथे फुलवीन, 

बाग मनोहर आनंदाची!

 

– वि. म. कुलकर्णी

शब्दार्थ

मंजूळ – ऐकायला गोड

तीर – काठ

लता – वेल

वृक्ष – झाड

सुमन – फूल

लव्हाळी – पाण्यात किंवा पाण्याजवळ वाढणारी एक वनस्पती

आम्रतरू – आंब्याचे झाड

शीतल – थंड

छाया – सावली

घट – मातीचा घडा (माठ)

मनोहर – सुंदर

स्वाध्याय

प्र. १. एका वाक्यात उत्तरे सांगा.

(अ) मंजूळ गाणे कोण गाते ?

उत्तर: मंजुळ गाणे नदी गाते.

 

(आ) गावे कोठे वसली आहेत ?

उत्तर: गावे नदीच्या तीरावरती बसली आहेत.

 

(इ) नदीवर शीतल छाया कोण धरते ?

उत्तर: नदीवर शीतल छाया आम्रतरू धरतात.

 

(ई) नदी जेथे जाईल तेथे काय करेल ?

उत्तर: नदी जेथे जाईल तेथे आनंदाची मनोहर बाग फुलवेल.

प्र. २. कवितेतील कडव्याच्या ओळी पूर्ण करा.

फुलवेली मज _____ देती,

कुठे _____ खेळत बसती,

कुठे _____ माझ्यावरती,

_____ अपुली छाया धरती.

उत्तर: 

फुलवेली मज सुमने देती,

कुठे लव्हाळी खेळत बसती,

कुठे आम्रतरू माझ्यावरती

शीतल अपुली छाया धरती.

प्र. ३. जोड्या जुळवा.

  ‘अ’ गट      

(१) ढगांचा     

(२) विजांचा   

(३) पाण्याचा  

(४) पंखांचा    

      ‘ब’ गट

(अ) खळखळाट

(आ) फडफडाट

(इ) गडगडाट

(ई) कडकडाट

उत्तर:

(१) झुळझुळ – पाणी

(२) मंजूळ – गाणे

(३) शीतल – छाया

प्र. ४. हे शब्द असेच लिहा.

मंजूळ

शीतल

झुळझुळ

लतावृक्ष

लव्हाळी

आम्रतरु 

प्र. ५. कवितेच्या चित्राचे निरीक्षण करा व पाच वाक्ये लिहा.

उत्तर: पर्वतावर उगम पावलेली नदी पुढे पुढे वाहत येत आहे. नदीच्या किनाऱ्यावर काही घरे दिसत आहेत. नदीच्या पात्रामध्ये गुरे पाणी पिताना दिसत आहेत व त्यांच्या पाठीमागे एक माणूस उभा आहे. दोन स्त्रिया नदीच्या पात्रातील पाणी घागरीमध्ये भरून नेताना दिसत आहेत. दोन मुलगे व एक मुलगी नदीच्या पाण्यामध्ये पोहण्याचा आनंद घेत आहेत. आकाशात काही पक्षी उडतानाही दिसत आहेत. नदीच्या आजूबाजूला हिरवीगार झाडे व हिरवळ पसरलेली दिसत आहे.

वाचू आणि हसू

शिक्षक : पप्पू, तू शाळेत टोपी घालून का येतोस ?

 

पप्पू : कुणाला कळायला नको, की माझ्या डोक्यात काय चाललं आहे ते!

IMG 20230920 114849 पाठ १५ – नदीचे गाणे

ओळखा पाहू!

लहानपणी हिरवा, 

चव माझी आंबट. 

मोठेपणी पिवळा, 

चव माझी गोड, 

मी तर आहे फळांचा राजा.

उत्तर: आंबा

 

लाल चोच माझी, 

डाळिंब मी खातो. 

हिरवा माझा रंग, 

मिठू मिठू बोलतो.

उत्तर: पोपट