Maharashtra Board Textbook Solutions for Standard Five

पाठ ९ – सिंह आणि बेडूक

ऐका. वाचा. लक्षात घ्‍या.

IMG 20230919 234318 पाठ ९ – सिंह आणि बेडूक

उत्तर: एका जंगलात एक सिंह राहायचा. त्याला त्या जंगलाचा कंटाळा आला आणि तो नव्या जंगलात राहायला गेला. एकदा सिंह मोठ्याने गरजला. त्या जंगलात अनेक प्राणी व पक्षी तसेच काही बेडूकही राहत होते. त्यांनी यापूर्वी सिंहाला पाहिले नव्हते. त्यांचा बेडूक पुढारी म्हणाला, “कोणीतरी मोठा आवाज बेडकाने काढत आहे. आता मीही मोठा आवाज काढतो.” बेडकाने मोठा आवाज काढला. सिंहाला हा आवाज नवीन होता. सिंहाने वाटले, ‘कोणीतरी आपल्याला आव्हान देत आहे, आपण सावध राहिले पाहिजे.’ सिंहाने आपली गर्जना थांबवली. तो शांत उभा राहिला. बेडूक मोठमोठ्याने ओरडत पुढे पुढे सरकू लागला. सिंहाने त्याला पाहिले व त्याचा आवाज ऐकला. सिंह वेगाने पुढे सरकला. सिंहाने बेडकाच्या डोक्यावर पाय दिला. बेडूक गयावया करू लागला. सिंहाने त्याला सोडून दिले.

स्वाध्याय

प्र. १. या गोष्टीतील प्राण्यांची नावे सांगा व लिहा. 

उत्तर: सिंह, बेडूक या प्राण्यांची नावे गोष्टीत आली आहेत.

 

प्र. २. सिंह व बेडूक यांमध्ये हुशार कोण, ते सांगा.

उत्तर: सिंह व बेडूक यांमध्ये सिंह हुशार आहे.

 

प्र. ३. गोष्टीतील प्राण्यांचा आवाज कसा आहे ते माहीत करून घ्या. आवाज काढून दाखवा. 

उत्तर: खालील प्राण्यांच्या ओरडण्याला काय म्हणतात ते वाचा.

(अ) वाघाची – डरकाळी

(आ) हत्तीचा – चीत्कार

(ई) बकरीचे – बें – बें

(इ) गाईचे – हंबरणे

(उ) घोड्याचे – खिंकाळणे

(ऊ) कुत्र्याचे – भुंकणे

चित्रसंदेश

ऐका. वाचा.

IMG 20230919 234339 पाठ ९ – सिंह आणि बेडूक

वाचा. लक्षात ठेवा.

वरील संदेशात ‘पाटी’ हा शब्द दोन अर्थानी आला आहे.

 

पाटी 

१. टोपली. 

२. ज्यावर लिहिले जाते ती.

 

संदेश

मुलामुलींच्या डोक्यावर पाटी नको, हातात पाटी दया, म्हणजे मुलामुलींना शिकवा.