पाठ ४ – ही पिसे कोणाची?
शब्दार्थ
दूर – लांब
निरखून पाहणे – लक्षपूर्वक पाहणे
मोहक – सुंदर
स्वाध्याय
प्र. १. उत्तरे सांगा.
(अ) मिनूचे घर कोठे होते?
उत्तर: मिनूचे घर शेतात होते.
(आ) मिनू कोणाकोणाला भेटली ?
उत्तर: मिनू कोंबडी, कबुतर, मोर व बदक यांना भेटली.
(इ) मिनूला बदकाचा पत्ता कोणी सांगितला ?
उत्तर: मिनूला बदकाचा पत्ता मोराने सांगितला.
(ई) पिसे कोणाची होती?
उत्तर: पिसे बदकाची होती.
(उ) बदकाने मिनूला काय सांगितले?
उत्तर: बदकाने मला सांगितले की गळून पडलेली पिसे पुन्हा जोडली जात नाहीत तेव्हा अशी पिसे तू जपून ठेव.
प्र. २ रिकाम्या जागी जुळणाऱ्या योग्य पर्यायापुढे ✓ अशी खूण करा.
पिसे सापडल्यावर मिनूला ______
(अ) पिसे कोणाची आहेत, हे माहीत करून घ्यायचे होते.
(आ) पिसे घरी न्यायची होती.
उत्तर: पर्याय (अ) – पिसे कोणाची आहेत, हे माहीत करून घ्यायचे होते.
प्र. ३. जोड्या जुळवा.
‘अ’ गट
(१) बदक
(२) कोंबडी
(३) कबुतर
‘ब’ गट
(अ) झाड
(आ) नदी
(इ) खुराडे
उत्तर:
(१) बदक – (आ) नदी
(२) कोंबडी – (इ) खुराडे
(३) कबुतर – (अ) झाड
प्र. ४. उदाहरणे वाचा. त्याप्रमाणे लिहा.
उदाहरणे:
घर – घरापासून
घर – घराजवळ
खुराडे – खुराड्यात
गाव
उत्तर:
गावापासून
गावाजवळ
गावात
पाय
उत्तर:
पायापासून
पायाजवळ
पायात
तळे
उत्तर:
तळ्यापासून
तळयाजवळ
तळयात
घरटे
उत्तर:
घरट्यापासून
घरट्याजवळ
घरट्यात
प्र. ५. तुम्हाला शाळेत / वर्गात एखादी वस्तू सापडली तर तुम्ही काय करता?
उत्तर: शाळेत / वर्गात एखादी वस्तू सापडली तर आम्ही वर्गातील विद्यार्थ्यांपैकी ती कोणाची आहे का? असे विचारतो आणि ज्याची असेल त्याला देतो. कोणाचीही नसेल तर वर्गशिक्षकांना देतो आणि त्यांना सांगतो की, शाळेत / वर्गात आम्हांला ही वस्तू सापडली आहे.
उपक्रम:
तुमच्या परिसरात आढळणाच्या विविध पक्ष्यांच्या पिसांचे निरीक्षण करा व त्यांचे आकार, माहिती लिहा.
उत्तर:
(१) चिमणी –
चिमणीच्या पोटाच्या भागावर पांढऱ्या रंगाची पिसे असून पाठीवर तांबूस, मातीच्या किंवा तपकिरी रंगांची छोटी पिसे असतात.
(२) कावळा –
कावळ्याची पिसे राखाडी, काळ्या रंगाची असून मध्यम आकाराची असतात.
(३) पोपट –
पोपटाची पिसे मध्यम आकाराची असून हिरव्या रंगाची असतात. सर्व पक्ष्यांना त्यांच्या पिसांचा उपयोग शरीर रक्षणासाठी होतो. उडताना त्यांना या पिसांच्या पंखांचाच उपयोग होतो आणि ते सहजरीत्या उडू शकतात.