पाठ – हास्यचित्रांतली मुलं (स्थूलवाचन)
स्वाध्याय
प्र. १. खालील फरक लिहा.
उत्तर:
व्यंगचित्र : हास्यचित्राचा पुढचा टप्पा म्हणजे व्यंगचित्र होय. हास्यचित्राप्रमाणे व्यंगचित्रसुद्धा आपल्याला हसवतं. पण केवळ हसवणं एवढाच त्याचा हेतू नसतो. व्यंगचित्र पाहिल्यावर आपल्याला हसूही येतं आणि ते आपल्याला त्याशिवाय काहीतरी सांगू पाहत असतं. आपण जर त्या चित्रापाशी थोडं थांबून राहिलो, तर त्यात मांडलेला एखादा गमतीदार विचार आपल्या सहज लक्षात येतो.
हास्यचित्र : ‘सफाईदार, रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र होय.’ हास्यचित्राचे खास वैशिष्ट्य म्हणजे ते पाहिले की आपल्याला छान हसू येते. या गमतीदार चित्रांमध्ये एक जोक, एक विनोद मांडलेला असतो. त्या चित्रांमधला एखादा माणूस दुसऱ्या माणसाशी काहीतरी बोलतो. ते वाचलं की आपल्याला हसू येतं. त्यातून खास असा विचार मांडलेला दिसून येत नाही.
प्र. २. वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर:
(१) हास्यचित्राचा पुढला टप्पा म्हणजे व्यंगचित्र होय.
(२) व्यंगचित्रे आपल्याला हसवतात, पण केवळ हसवणं एवढाच त्यांचा हेतू नसतो.
(३) व्यंगचित्र पाहिल्यावर आपल्याला हसूही येतं आणि ते आपल्याला त्याशिवाय काहीतरी सांगू पाहत असतं.
(४) आपण जर अशा व्यंगचित्रापाशी थोडं थांबून राहिलो तर त्यात मांडलेला गमतीदार विचार आपल्या लक्षात येतो.
प्र. ३. ‘व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण-दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे’, हा विचार सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर: व्यंगचित्राचा केवळ हास्य हा हेतू नाही. व्यंगचित्रामध्ये एखादा विचार गमतीशीर पद्धतीने मांडलेला असतो. माणसाच्या विसंगत वर्तनावर बोट ठेवण्याचा नेमकेपणा व्यंगचित्रात असतो. व्यंगचित्र प्रभावीपणे व्यक्तीचे गुण-दोष मांडते. उदाहरणार्थ, प्रस्तुत पाठात हंगेरियन व्यंगचित्रकार रेबर यांचे व्यंगचित्र याची साक्ष पटवते. इथे पहिल्या चित्रात लहान मुलगा स्टुलावर चढून भले मोठे व्हायोलीन वाजवत आहे व दुसऱ्या चित्रात तोच मुलगा मोठेपणी लहान व्हायोलीन वाजवत आहे. या चित्रांतून,
(१) लहान मुलांना मोठ्या वस्तूंचे आकर्षण असते, ते बाह्य आकाराला भुलतात, हे सांगितले आहे, व,
(२) वय वाढल्यावर वृत्तीत प्रगल्भता येते. बाह्य आकाराचे आकर्षण संपते. छंद अधिक खोल व सूक्ष्म होतो, या गोष्टींचे मर्म सांगितले आहे.
म्हणजेच, व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुण-दोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे, हे सिद्ध होते.
Humour is not the only purpose of a cartoon. In a cartoon, an idea is presented in a humorous way. Satire has the precision to point out the anomalous behavior of man. Caricature effectively portrays a person’s strengths and weaknesses. For example, the cartoon of the Hungarian cartoonist Reber in the present text testifies to this. Here in the first picture a small boy is playing a big violin on a stool and in the second picture the same boy is playing a small violin as an adult. From these pictures,
(1) It is said that children are attracted to large objects, they ignore the external shape, and,
(2) Attitude deepens with age. The attraction of outer shape ends. The hobby becomes deeper and more subtle, the meaning of these things is said.
That is, it proves that caricature is an effective weapon to present the qualities and faults of a person.
प्र. ४. प्रस्तुत पाठातील व्यंगचित्रांपैकी तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एका व्यंगचित्राचे तुम्ही केलेले निरीक्षण बारकाव्यासह स्वत:च्या शब्दांत लिहा.
उत्तर: मला ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणिस यांनी काढलेले लहान मुलीचे व्यंगचित्र खूपच भावते. शि. द. फडणिसांचा रेषा भूमितीय असूनही खूप आकर्षक व ठळक आहे. लहान रोपटे व लहान मुलगी यांचा भावबंध त्यांनी अचूक टिपला आहे. रोपट्याला दुधाच्या बाटलीतून पाणी देतानाच्या तिच्या चेहऱ्यावर उमटलेले निरागस भाव केवळ अप्रतिम आहेत. भलीमोठी दुधाची बाटली तिने सावरली आहे व कमरेत वाकून रोपट्याला पाणी घालताना तिची ओतप्रोत माया तिच्या डोळ्यांतूनही टपकते आहे. रोपट्याला लहान बाळ समजणे व आपली आई आपले जसे पोषण करते, तसे रोपट्याचे पोषण करणे, हा सृजनशील संदेश यातून चित्रकारांनी दिला आहे. रोपट्याची आई होण्यातील ममत्व ही निरागस शालीनतेची निशाणी ठरते.
Senior cartoonist S. D. Phadnis drew a cartoon of a little girl that is very touching. S. D. Phadnis’s line is geometric yet very attractive and bold. He has accurately captured the bond between a small plant and a little girl. The innocent expression on her face while feeding the sapling from the milk bottle is simply amazing. She has recovered a big bottle of milk, and while bending at the waist to water the plant, her overflowing Maya is also dripping from her eyes. The creative message given by the painters is to consider the plant as a small baby and to nurture the plant as our mother nurtures us. Tenderness in mothering a plant is a sign of innocent decency.
प्र. ५. ‘व्यंगचित्र रेखाटणे’ ही कला आत्मसात करण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते, यासंबंधी तुमचे विचार लिहा.
उत्तर: व्यंगचित्र रेखाटणे ही अद्वितीय कला आहे. त्याला निर्मळ मन लागते, म्हणजे तुमची रेषाही निर्मळ राहते. व्यंगचित्रकाराला जीवनातली विसंगती टिपता आली पाहिजे. तसेच विषयाविषयी अपार करुणा असली पाहिजे. गुण-दोष दाखवताना माणसांची खिल्ली न उडवता, समंजसपणा असायला हवा. रेषा नाजूक तरीही ठाशीव असायला हवी. गमतीशीर विचारांची पखरण हवी. जीवन समृद्ध करणारे भाष्य व्यंगचित्रकाराला रेषांतून यशस्वीपणे मांडता आले पाहिजे. चित्र रेखीव व अनेक अर्थांचे सूचन करणारे हवे.
Caricature drawing is a unique art. It requires a pure mind, so your line also remains pure. A cartoonist should be able to capture the inconsistencies in life. Also one should have immense compassion towards the subject. While pointing out merits and demerits, there should be reasonableness without making fun of people. The line should be delicate yet firm. We need a lot of funny ideas. A cartoonist must be able to convey life-enriching commentary successfully through lines. The picture should be linear and suggestive of multiple meanings.
प्र. ६. ‘लहान मुलांची हास्यचित्रे काढणे अवघड आहे’, याबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर: लहान मुले निरागस असतात. त्यांच्या सवयी व आवडीनिवडी यांचे बारकाईने निरीक्षण करणे चित्रकाराला गरजेचे आहे. लहान मुलांचा चेहरा, त्यावरचे भाव व त्यांच्या हालचाली अचूक टिपता यायला हव्यात. शरीराच्या प्रत्येक अवयवाचा आकार शरीराच्या प्रमाणबद्धतेत लहान करावा लागतो. लहान मुलांच्या बारीकसारीक गोष्टींचे सूक्ष्म निरीक्षण करण्याची शक्ती हास्यचित्रकाराला अवगत असायला हवी. लहान मुलांचे मानसशास्त्र पूर्णपणे समजणे ही चित्रकारासाठी पहिली अट आहे. या सर्व कारणांमुळे लहान मुलांची हास्यचित्रे काढणे अवघड असते, असे मलाही वाटते.
Children are innocent. It is necessary for the painter to closely observe their habits and preferences. Children’s faces, expressions and movements should be captured accurately. The size of every part of the body has to be reduced in proportion to the body. A cartoonist should be aware of the power of subtle observation of small details. A thorough understanding of the psychology of children is a prerequisite for the painter. Because of all these reasons, I also think that it is difficult to draw funny pictures of children.
उपक्रम : ५ मे या जागतिक व्यंगचित्र दिनाच्या निमित्ताने शाळेमध्ये व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरवा व त्यांचा आस्वाद घ्या.
उत्तर: विद्यार्थ्यांनी हे स्वतः करावे.