Maharashtra Board Textbook Solutions for Standard Nine

पाठ ८ – सखू आजी

स्वाध्याय

प्र. १. खालील घटनेचा लेखकावर झालेला परिणाम लिहा.

IMG 20230916 162331 पाठ ८ – सखू आजी

उत्तर: 

IMG 20230916 162810 पाठ ८ – सखू आजी

प्र. २. ‘सखू आजी कवितेत बोलते, कवितेत जगते’ हे विधान स्पष्ट करणारी पाठातील वाक्ये शोधा.

उत्तर: 

(अ) ‘हाडं गेली वड्याला, बघा माज्या मड्याला’.

(आ) ‘मरण लोकाला, सरण दिक्काला / माजं कपाळ, भरलं आभाळ / मरलं माणूस, झिजलं कानुस / म्हातारी नवसाची, भरून उरायची’.

(इ) ‘गाव गरतीला, सपान धरतीला / धरती दुवापली, माती हाराकली’.

प्र. ३. गुणवैशिष्ट्ये लिहा

IMG 20230916 162417 पाठ ८ – सखू आजी

उत्तर: 

IMG 20230916 162758 पाठ ८ – सखू आजी

प्र. ४. कंसातील सूचनेनुसार बदल करा.

(अ) याबाबत मला काहीही म्हणायचे नाही. (काळ ओळखा.)

उत्तर: वर्तमानकाळ

 

(आ) आजी, कुठं चाललीस? (अधोरेखित शब्दाची जात ओळखा.)

उत्तर: आजी नाम

 

(इ) आजी माझ्या जवळची होती. (अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा.)

उत्तर: आजी माझ्या लांबची होती.

 

(ई) डोंगराच्या कुशीत वसले होते ते गाव! (अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द लिहून वाक्य पुन्हा लिहा.)

उत्तर: पर्वताच्या कुशीत वसले होते ते गाव!

प्र. ५. स्वमत.

(अ) सखू आजीच्या व्यक्तिमत्त्व विशेषांपैकी तुम्हांला भावलेल्या कोणत्याही दोन विशेषांचे सकारण स्पष्टीकरण करा.

उत्तर: सातबा घोरपड्यांच्या मुलग्याने गैरवर्तन केले असे गावबैठकीत ठरले व दंड दिला गेला, तेव्हा सखू आजीने सगळ्या पंचांना खडसावले व मुलाची शिक्षा रद्द केली. या प्रसंगात सखू आजीच्या बाणेदार स्वभावाचे दर्शन आपल्याला घडते. सारे गाव विरुद्ध असताना एकटीने खरा न्याय देणे व गावसभेला खाली मान घालायला लावणे या धाडसाचे मला अनोखे दर्शन आजीच्या व्यक्तिमत्त्वात दिसले.

 

प्रौढ साक्षर वर्गाला गावचा शिक्षित मुलगा मास्तर म्हणून देणे व स्वतः पंधरा दिवसांत शिकून सर्व बायकांना शिकवणे हे सखू आजीचे कर्तृत्व अफाट आहे. शिक्षणाविषयीची तळमळ व दूरदृष्टी आजीला होती. शिक्षणाचे अनमोल महत्त्व ती जाणत होती. म्हणून या प्रसंगातून मला आजीच्या प्रगतिशील व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते.

When it was decided in the village meeting that Satba Ghorpadi’s son had misbehaved and was fined, Sakhu Aji reprimanded all the judges and canceled the boy’s punishment. In this episode, we get to see Sakhu Aji’s bold nature. I saw a unique vision of the courage to give real justice alone when the whole village was against and make the village assembly bow down in the personality of grandmother.

 

Giving an educated boy of the village as a teacher to the adult literate class and teaching all the women in fifteen days by herself is the immense achievement of Sakhu Aji. Grandma had a longing and vision for education. She knew the precious importance of education. So through this incident I see the progressive personality of grandmother.

(आ) खालील मुद्‌द्यांना अनुसरून सखूआजीविषयी तुमचे मत लिहा.

(१) करारीपणा 

उत्तर: सातबा घोरपड्याच्या मुलाच्या संदर्भात आजीने स्वतः न्याय दिला व त्याची शिक्षा रद्द केली. या प्रसंगी सखू आजीने दाखवलेला करारीपणा वाखाणण्याजोगा आहे; कारण गावबैठकीतील सर्व पंचांनी घोरपड्याच्या मुलाला शिक्षा केली होती. पण लहान मुलाची चूक ही पदरात घेऊन त्याला माफ करायचे असते, हा घडा आजीने ग्रामसभेला शिकवला. आजीला गावात किती मान होता हे या प्रसंगातून स्पष्ट होते व तिची न्यायदृष्टी किती निखळ व निर्मळ होती हे दिसून येते. आजीच्या या धाडसामुळे कोवळा जीव वाया गेला नाही. आजीच्या या करारीपणाचे व्यक्तिमत्त्व आपल्यालाही नकळत शिकवण देते.

In regard to the son of Satba Ghorpadya, the grandmother herself gave justice and canceled his sentence. Sakhu Aji’s bravery on this occasion is admirable; Because all the panchas in the village meeting had punished Ghorpadya’s son. But taking the mistake of a small child and forgiving him, this is what grandmother taught the Gram Sabha. It is clear from this incident how much respect the grandmother had in the village and how clear and pure her sense of justice was. The young man’s life was not wasted due to the grandmother’s courage. Grandma’s personality of this agreement teaches us even unknowingly.

(२) आजीचा गोतावळा

उत्तर: सखू आजी गावातील कुणाच्याही सणासमारंभाला जायची व पुढाकार घ्यायची. तिने आयाबायांना साक्षर केले. अंगठेबहादर सरपंचाला सहीपुरता साक्षर केला. गावात पहिल्यांदा पोलीस झालेल्या तरुणाला आजीने गावच्या बायकांना गोळा करून ड्रेसवर ओवाळले व दही-साखरेने त्याचे तोंड गोड केले. आजीला गावामध्ये लहान थोर माणसे मान देत असत. तिचे करारी – व्यक्तिमत्त्व सगळ्यांना योग्य न्याय देणारे होते. अशा प्रकारे सारा गाव हा सखू आजीचा गोतावळा होता.

Sakhu Aji used to go to anyone’s festival in the village and take initiative. She made Ayabaya literate. Angthebahadar made Sarpanch literate. The young man who became the first policeman in the village was gathered by the women of the village and waved on his dress and sweetened his mouth with curd and sugar. Grandmother used to be respected by small and noble people in the village. Her agreeable personality was fair to all. Thus the entire village was Sakhu Aji’s dive.

प्र. ६. अभिव्यक्ती.

(अ) ‘बदलत्या गावगाड्यात आजीला जागाच उरली नाही.’ या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.

उत्तर: पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती होती. त्यामुळे घराघरात आजी संस्कृती होती. आजी घरातील लहान मुलांना गोष्टी सांगायची. त्यांच्यावर चांगले संस्कार करायची. घरादारात व गावगाड्यात आजीला मान होता. आजीसारख्या वृद्ध व्यक्तींच्या मताचा आदर केला जाई. घराघरात आजीचा वचक होता. गावगाडा बदलला म्हणजे एकत्र कुटुंबपद्धती लयाला गेली. जागोजागी पाळणाघरे निघाली. जागेअभावी बहुतांश आजीआजोबांचा निवास वृद्धाश्रमात हलवण्यात आला. मुलांपासून व नातवंडांपासून आजी दूर गेली. त्यामुळे ‘बदलत्या गावगाड्यात आजीला जागाच उरली नाही’ असे म्हटले जाते.

Earlier there was joint family system. So there was a grandmother culture in the household. Grandmother used to tell stories to the children of the house. Good manners should be done on them. Grandmother was respected in the household and in the village. Respect the opinion of elderly persons like grandmother. In the household there was a grandmother. The village changed, which meant that the family system was broken. Nurseries started everywhere. Due to lack of space, the residence of most of the grandparents was shifted to old age homes. Grandma moved away from her children and grandchildren. Therefore, it is said that ‘there is no place left for the grandmother in the changing village train’.

(आ) तुम्हांला समजलेल्या सखू आजीचे व्यक्तिचित्र रेखाटा.

उत्तर: नव्वद वर्षांची सखू आजी हातात काठी घेऊन गावभर फिरून सर्वांची आस्थेने चौकशी करायची. ती नेहमी कवितेत व म्हणींत बोलायची. लहान मुलांना ती चमत्कारिक गोष्टी सांगून रमवायची. आजी कुणाच्याही सणवारांना जायची. गावबैठकीत तिने दाखवलेला करारीपणा अनोखा होता. गावात प्रौढ साक्षरतेचा वर्ग चालवण्यात तिचा पुढाकार होता. तिने गावच्या सरपंचाला साक्षर केलेच पण सर्व आयाबायांनाही शिकवले. तिला सद्गुणांची कदर होती, म्हणून गावच्या पहिल्या पोलिसाचा तिने सत्कार केला. लेखकाला मास्तर बनवला. संपूर्ण गावात तिच्या सत्यप्रियतेचा वचक होता. गावात सखू आजीला मान होता आणि संपूर्ण गाव तिचा गोतावळा होता. ती मरण पावली तेव्हा लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच माणसांचे डोळे पाणावले.

Ninety-year-old grandmother Sakhu used to walk around the village with a stick in her hand and eagerly inquired about everyone. She always spoke in poetry and proverbs. She used to amuse the children by telling them miraculous stories. Grandma used to go to anyone’s festivals. The agreement she showed in the village meeting was unique. She took the lead in running an adult literacy class in the village. She not only educated the village sarpanch but also taught all the mothers. She valued virtue, so she felicitated the village’s first policeman. Made the writer a master. The entire village was the talk of her truthfulness. Sakhu Aji was respected in the village and the whole village was her dive. When she died, the eyes of all people, from the young to the great, wept.

(इ) सखू आजी व तुमची आजी यांच्या स्वभावातील साम्यस्थळे शोधा.

उत्तर: सखू आजीप्रमाणे माझी आजीसुद्धा खूप प्रेमळ आहे. माझ्या आजीचे नाव जानकी आहे. माझी जानकी आजी साऱ्या गावाची सुद्धा आजीच आहे. सारे गावकरी तिच्यासाठी जणू तिचे नातेवाईकच आहेत. गावातून फिरताना ती प्रत्येकाशी प्रेमाने बोलते. तिच्याविषयी साऱ्यांच्या मनात आदर आहे. कोणतेही संकट आले, अडचण आली तर सल्ला मागायला गावकरी येतात. आजीच्या विचारांना सगळे मान देतात. गावातल्या लहान-लहान मुलांना जमवून त्यांना छान गोष्टी सांगणे तिला आवडते. पण कोणी शाळेला दांडी मारली तर तिला आवडत नाही. ‘शिकून सवरून मोठे व्हा’ असे तिचे नेहमी सांगणे असते. गावामध्ये कोणी मरण पावले, कोणाकडे बारसे असेल, कुणाकडे लग्न असेल तर माझी ‘जानकी आजी’ तिथे मुद्दाम असणारच. तिच्या सूचनेनुसार सगळे वागतात. तिचा शब्द कोणी मोडत नाही.

Like Sakhu Aji, my grandmother is also very affectionate. My grandmother’s name is Janaki. My Janaki Aji is also the grandmother of the whole village. All the villagers are like her relatives to her. As she walks through the village, she speaks lovingly to everyone. Everyone has respect for her. Villagers come to seek advice if there is any crisis or problem. Everyone respects grandma’s thoughts. She likes to gather the small children of the village and tell them nice things. But she doesn’t like it if someone stalks the school. She always says, ‘Learn and grow’. If someone died in the village, someone had a wedding, someone got married, my ‘Janaki Aji’ would be there on purpose. Everyone acts according to her instructions. No one breaks her word.

भाषाभ्यास

खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

(१) यथामती

उत्तर: मतिप्रमाणे 

 

(२) हरसाल

उत्तर: प्रत्येक वर्षी 

 

(३) गावोगाव

उत्तर: प्रत्येक गावी 

 

(४) आमरण

उत्तर: मरेपर्यंत 

 

(५) यथाशक्ती 

उत्तर: शक्तीप्रमाणे

द्‌वंद्‌व समास

खालील उदाहरणे वाचा व अभ्यासा.

(१) मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी.

उत्तर: आईवडील – आई आणि वडील – इतरेतर द्वंद्व. 

 

(२) आई गावाहून चार पाच दिवसात परत येईल.

उत्तर: चार-पाच – चार किंवा पाच – वैकल्पिक द्वंद्व.

 

(३) दूरच्या प्रवासात सोबत अंथरुण पांघरुण घ्यावे.

उत्तर: अंथरूण-पांघरूण – अंथरूण पांघरूण वगैरे –  समाहार द्वंद्व.

 

(१) अधोरेखित शब्दात किती पदे आहेत?

(२) दोन्ही पदे महत्त्वाची वाटतात काय?

 

दोन्ही पदे महत्त्वाची

द्‌वंद्‌व समास वैशिष्ट्ये

समासाचा विग्रह आणि, व, या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययांनी नाहीतर किंवा, अथवा या विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययांनी करतात.

द्‌वंद्‌व समासाचे तीन उपप्रकार

IMG 20230916 161901 पाठ ८ – सखू आजी

तक्ता पूर्ण करा. 

बाजूच्या चौकटीतून शब्द किंवा शब्दसमूह योग्य ठिकाणी भरून नंतर उरलेल्या चौकटी भरा.

IMG 20230916 161935 पाठ ८ – सखू आजी

उत्तर: 

IMG 20230916 163105 पाठ ८ – सखू आजी