Maharashtra Board Textbook Solutions for Standard Eight

पाठ २ – मी चित्रकार कसा झालो!

आपसूक – आपोआप.

दुथडी भरून वाहणे – ओसंडून वाहणे. 

तहानभूक हरपणे – कामात मग्न होणे. 

गडप – गायब. 

हिरमोड होणे – नाराज होणे. 

नांद्रुक – पिंपरण आणि पिंपळवर्गीय झाड.

स्‍वाध्याय

प्र. १. उत्तर लिहा.

लेखकाने पाठात कलेसंबंधी वर्णिलेले दोन विषय

(१) ………….. 

(२) …………..

उत्तर: 

(१) चित्रकला 

(२) मूर्तीकला

प्र. २. काय ते सांगा.

(अ) मूर्तीला तडे जाऊ नये यासाठी लेखकाला सापडलेला उपाय.

उत्तर: 

(i) मातीत गाईचे शेण मिसळणे.

(ii) नंतर मातीत घोड्याची लीद मिसळणे.

 

(आ) लेखकाचा कॅनव्हास.

उत्तर: पाण्याच्या प्रवाहामुळे गुळगुळीत, सपाट झालेले, लांबरुंद पसरलेले खडक.

प्र. ३. आकृती पूर्ण करा.

(अ) 

IMG 20230803 172143 पाठ २ – मी चित्रकार कसा झालो!

उत्तर:

IMG 20230803 173110 1 पाठ २ – मी चित्रकार कसा झालो!

(आ) 

IMG 20230803 172118 पाठ २ – मी चित्रकार कसा झालो!

उत्तर:

IMG 20230803 174509 पाठ २ – मी चित्रकार कसा झालो!

प्र. ४. योग्य जोड्या जुळवा.

‘अ’ गट  ‘ब’ गट
(१) पिवळा 
(अ) झाडांच्या पानापासून.
(२) जांभळा 
(आ) दगडांपासून.
(३) भगवा 
(इ) काटेसावरीच्या फुलातील परागकणांपासून.
(४) हिरवा 
(ई) शेंदरी झाडाच्या बियांपासून.

उत्तर:

‘अ’ गट  ‘ब’ गट
(१) पिवळा 
(आ) दगडांपासून.
(२) जांभळा 
(इ) काटेसावरीच्या फुलातील परागकणांपासून.
(३) भगवा 
(ई) शेंदरी झाडाच्या बियांपासून.
(४) हिरवा 
(अ) झाडांच्या पानापासून.

प्र. ५. एका शब्दांत उत्तर लिहा.

(अ) बांबूच्या कोवळ्या काडीपासून तयार व्हायचा –

उत्तर: ब्रश

 

(आ) चित्र काढण्यासाठी वापरला जाणारा कागद –

उत्तर: कॅनव्हास

 

(इ) लालभडक मातीपासून तयार केल्या जायच्या –

उत्तर: मूर्ती

 

(ई) ओलं असताना जसं असतं तसंच वाळल्यावरही राहतं –

उत्तर: गाईचं शेण

 

(उ) घोड्याच्या शेणाला म्हणतात –

उत्तर: लीद

प्र. ६. ‘तुमच्या इच्छा तीव्र असतील तर साधनांशिवाय साधना करता येते’ या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

उत्तर: इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस अशक्य ते शक्य करू शकतो. फक्त त्याच्या आतील इच्छाशक्ती प्रबळ असली पाहिजे, उदाहरणार्थ परीक्षेत चांगले गुण मिळावेत म्हणून काही ट्युशन व क्लास लावण्याची गरज नाही. कोणत्याही विद्यार्थ्यांने वर्गात शिकवतानाच लक्ष देऊन जर तो भाग, विषय समजून घेतला आणि स्वतः अभ्यास करून परीक्षेची तयारी केली तर त्यास चांगले गुण मिळू शकतात. फक्त त्याच्या मनात अभ्यास, सराव, पाठांतर करण्याची प्रबळ इच्छा हवी.

 

एखाद्या मातीच्या गोळ्यापासून मूर्ती बनवण्यासाठी काही प्रशिक्षण घेण्याचीच गरज नसते. ती कला आपल्या बोटात उपजतच असते फक्त तिला ओळखून प्रयत्न करणे महत्त्वाचे असते. अशी कितीतरी उदाहरणे आहेत की थोर मूर्तीकार कोणत्याही मूर्तीकलेच्या शाळेत न जाता त्यांच्या हातून चांगल्या प्रतीच्या मूर्ती घडल्या गेल्या आहेत. म्हणून मनात तीव्र इच्छा असेल तर कोणत्याही साधनांशिवाय कलेची साधना आपणास करता येते असे म्हणता येईल.

खेळूया शब्दांशी

खाली दिलेल्या शब्दांतून नाम व विशेषणे ओळखून त्यांच्या योग्य जोड्या लावा.

IMG 20230803 170058 पाठ २ – मी चित्रकार कसा झालो!
IMG 20230803 170119 पाठ २ – मी चित्रकार कसा झालो!

उत्तर:

IMG 20230803 171849 1 पाठ २ – मी चित्रकार कसा झालो!

शोध घेऊया

विविध झाडांपासून रंग तयार केले जातात त्याची आंतरजालाच्या मदतीने माहिती मिळवा.

उत्तर: विद्यार्थ्यांनी हे स्वतः केले पाहिजे.

चर्चा करूया

प्रत्येकाच्या अंगी काही ना काही कला असते. तुमच्या मित्र-मैत्रिणींसमवेत त्यांना आवडणाऱ्या गोष्टींविषयी (कला) चर्चा करा. ती गोष्ट त्यांना करायला का आवडते? यामागील कारणे समजून घ्या. 

उत्तर: विद्यार्थ्यांनी हे स्वतः केले पाहिजे.

उपक्रम : तुमच्या परिसराचे निरीक्षण करा. परिसरातील विविध घटकांपासून तुम्हांला काय काय शिकायला मिळते, त्याची नोंद करा.

उत्तर: या सौहार्दपूर्ण वातावरणात निसर्ग आणि माणसे अखंडपणे एकत्र राहतात. हिरवेगार लँडस्केप आणि किलबिलाट करणारे पक्षी मानवी उपस्थितीने अबाधित, भरभराट होत चाललेल्या परिसंस्था दर्शवतात. विविध प्रकारच्या क्रियाकलापांमुळे समुदायाची भावना निर्माण होते – मुले खेळत आहेत, कुटुंबे पिकनिक करतात आणि प्रौढ लोक संभाषण करतात. पायवाटेवरचे जॉगर्स आरोग्य आणि कल्याण यांना प्राधान्य देतात. गवत आणि फुलांचे सुगंध एक संवेदी अनुभव तयार करतात, लोकांना निसर्गाशी जोडतात. पिकनिकर्सकडून भेटवस्तू शोधणाऱ्या गिलहरी शहरी जीवन आणि वन्यजीव यांच्या सहवासाचे प्रदर्शन करतात. ही संतुलित आणि चांगल्या प्रकारे डिझाइन केलेली जागा पर्यावरणीय विविधता आणि समुदाय समृद्धीसाठी शहरी सेटिंग्जमध्ये हिरवे क्षेत्र जतन करण्याचे महत्त्व अधोरेखित करताना शारीरिक आणि भावनिक कल्याणास प्रोत्साहन देते.