पाठ २ – संतवाणी
(अ) अंकिला मी दास तुझा
Sant Namdev, while yearning for Shri Vitthal as his mother, considers himself His child and earnestly appeals to the Lord to look after him as His own child.
He further says, If, say, a child is accidentally caught in a fire, the compassionate mother rushes to rescue her baby. Likewise, O God, I urge you to come for my help. I am your ardent devotee, and I surrender myself at your feet.
If a baby bird suddenly falls to the ground from the tree, the mother bird, without a second’s delay, swoops down to save her baby at once. When the calf is very hungry, the mother cow rushes to feed her calf.
If there is a conflagration in the forest, the deer becomes anxious about the safety of her fawn, and her heart cries out to her.
Sant Namdev says, ‘O Vitthal, you are like a cloud filled with water. Let the water (i.e., your affection) shower upon me forever. I am like the Chatak bird, which cannot live without rainwater. You take care of my life. I implore you, my Lord’.
कनवाळू – दयाळू.
काज – काम.
अंकिला – अंकित झालेला.
सवें – लगेच.
वत्सरावें (वत्सरवें) – वासराच्या आवाजाने.
पाडस – हरिणीचे पिल्लू.
अग्निमाजि पडे बाळू ।
माता धांवें कनवाळू ॥१॥
तैसा धांवे माझिया काजा।
अंकिला मी दास तुझा ॥२॥
अर्थ : वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक संत नामदेव महाराज अगदी मनापासून आर्ततेने परमेश्वराचा (विठ्ठलाचा धावा करतात. त्यासाठी ते अतिशय समर्पक दृष्टान्त देतात. ते म्हणतात की, ज्याप्रमाणे नजरचुकीने अग्नित सापडलेल्या बाळाला वाचवण्यासाठी त्याची आई व्याकूळ होऊन, काळजीने त्याच्याजवळ धावून जाते. त्याला मायेने, प्रेमाने उचलून घेते. त्याचप्रमाणे हे प्रभू, विठ्ठला, मी पूर्णपणे तुझा अंकित आहे. मी तुझा दास, सेवक आहे. आईप्रमाणे तुही माझ्या अडचणीत, माझ्या कार्यात धावत ये.
Translation in English:
Sant Namdev Maharaj, the great preacher of the Warkari sect, prays to the Lord (Vitthal) with all his heart. He gives a very fitting vision for this. He says that just as a mother, distraught to save a baby accidentally caught in the fire, rushes to him with concern, picks him up with love and love. Similarly, O Lord, Vitthal, I am completely Your Ankita. I am Your servant, Your servant. Like a mother, You come running to my problems, to my work.
सवेंचि झेंपावें पक्षिणी ।
पिलीं पडतांचि धरणीं ॥३॥
अर्थ : विठ्ठलाची आळवणी करताना संत नामदेव महाराज म्हणतात, झाडावरील घरट्यात असणारे पक्ष्याचे लहान पिल्लू घरट्यातून बाहेर येऊन उडण्याच्या प्रयत्नात खाली जमिनीवर पडताच त्याची आई ती पक्षिणी आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी त्याच्या दिशेने तत्परतेने झेप घेते. त्याला पुन्हा घरट्यात नेण्यासाठी धडपडते. त्याचप्रमाणे हे परमेश्वरा, तुझ्या या सेवकासाठी तू असाच धावून ये.
Translation in English:
Sant Namdev Maharaj while praising Vitthal says, when a baby bird in a nest on a tree comes out of the nest and falls down to the ground in an attempt to fly, its mother bird immediately jumps towards it to save her baby. Struggles to get him back to the nest. In the same way, O Lord, do you come running for this servant of yours.
भुकेलें वत्सरावें ।
धेनु हुंबरत धांवे ॥४॥
अर्थ : संत नामदेव महाराज अगदी मनापासून विठ्ठलाचा धावा करतात. ते म्हणतात, भूकेने व्याकूळ झालेले वासरू गोठ्यात ओरडत असते. त्याची ती अवस्था सहन न होऊन गाय मोठ्याने हंबरत आपल्या वासराच्या ओढीने त्याच्याजवळ धावत येते. त्याचप्रमाणे हे विठ्ठला तूही माझ्यासाठी धावून ये.
Translation in English:
Sant Namdev Maharaj prays for Vitthal with all his heart. They say, the hungry calf cries in the manger. Unable to bear his condition, the cow comes running towards him with a loud hum along with her calf. Similarly, O Vitthal, you also run for me.
वणवा लागलासे वनीं ।
पाडस चिंतीत हरणी ॥५॥
अर्थ : संत नामदेव श्री विठ्ठलाची मनापासून विनवणी करतात. अगदी व्याकूळ होऊन हरिणीचे उदाहरण ते देतात. ते म्हणतात की, जंगलात वणवा पसरलेला आहे आणि त्यात हरिणीचे पाडस अडकलेले आहे. अशावेळी त्याची आई म्हणजेच हरिणी आपल्या पाडसाला वाचवण्यासाठी खूप चिंतीत होते. त्या पाडसासारखीच मा- झी अवस्था झाली आहे. म्हणून तू माझ्यासाठी धावून ये.
Translation in English:
Sant Namdev earnestly pleads with Shri Vitthal. They give the example of a deer, who is very disturbed. They say that there is a wildfire in the forest and the fallow of deer is stuck in it. At that time his mother i.e. deer was very anxious to save her fallow. I have become like that fallow. So you run for me.
नामा म्हणे मेघा जैसा ।
विनवितो चातक तैसा ॥६॥
अर्थ : चातक पक्षी पावसाचा पहिला थेंब पिऊन जगतो. तेच त्याच्यासाठी जीवन असते असे मानले जाते. हाच दृष्टान्त देऊन संत नामदेव महाराज म्हणतात की, ज्या प्रमाणे चातक पक्षी आकाशात जमलेल्या काळ्या काळ्या, पाण्याने भरलेल्या ढगांना पाणी बरसवण्यासाठी विनवणी करतो. त्याचप्रमाणे हे विठ्ठला, मी तुला विनवितो आहे.
Translation in English:
The Chatak bird lives by drinking the first drop of rain. That is what life is supposed to be for him. Sant Namdev Maharaj, giving the same vision, says that just as the Chatak bird begs the black, water-filled clouds gathered in the sky to shower them with water. Similarly, O Vitthal, I beseech you.
कृती
(१) पाठाच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा.
(अ) माता धावून जाते…..
उत्तर: जेव्हा बाळ आगीत पडते.
(आ) धरणीवर पक्षिणी झेपावते…..
उत्तर: जेव्हा पक्षिणीचे पिल्लू झाडावरून खाली पडते.
(इ) गाय हंबरत धावते…..
उत्तर: जेव्हा वासराला भूक लागते.
(ई) हरिणी चिंतित होते…..
उत्तर: जेव्हा पाडस वणव्यामध्ये सापडते.
(२) आकृती पूर्ण करा.
उत्तर:
(३) कोण ते लिहा.
(अ) परमेश्वराचे दास –
उत्तर: संत नामदेव
(आ) मेघाला विनवणी करणारा –
उत्तर: चातक
(४) काव्यसौंदर्य.
(अ) खालील ओळींचे रसग्रहण करा.
‘सवेंचि झेंपावें पक्षिणी । पिलीं पडतांचि धरणीं ।।
भुकेलें वत्सरावें । धेनु हुंबरत धांवे ।।’
उत्तर:
आशयसौंदर्य : कवी संत नामदेव यांचा ‘अंकिला मी दास तुझा’ हा अभंग आहे. या अभंगात संत नामदेव यांनी श्रीविठ्ठलाला आई असे समजून स्वत:चा सांभाळ करण्याची विनवणी केली आहे. मायेची कृपा देवाने आपल्यावर करावी, हा आशय या कवितेतून काही उदाहरणांनी व्यक्त होतो.
काव्यसौंदर्य : प्रस्तुत दोन चरणांमध्ये पक्षिणी आणि गाय या दोन मातांचे दृष्टान्त संत नामदेवांनी दिले आहेत. श्रीविठ्ठलाची आळवणी करताना ते म्हणतात आपले पिल्लू फांदीवरून पडताना जेव्हा पक्षिणी पाहते, तेव्हा त्यांचे रक्षण करण्यासाठी वेगाने जमिनीवर झेप घेते व पिलाला वाचवते. तसेच वासरू जेव्हा भुकेले होते, तेव्हा त्याच्या ओढीने त्याला दूध पाजण्यासाठी गाय हंबरत धावत जाते.
भाषिक वैशिष्ट्ये : अतिशय लडिवाळ शब्दांमध्ये पक्षिणी व गायीचा मातृभाव येथे व्यक्त होतो आणि बाळाची व्याकुळता मनाला भिडते. ‘झेपावे, धावे’ या क्रियापदांमधून बाळाची ओढ प्रकर्षाने गडद केली आहे. पक्षिणी व गाय यांच्या दृष्टान्तांतून संत नामदेवांनी प्राणी-पक्ष्यामधील मातृप्रेमाचे दाखले भावपूर्ण शब्दांत गुंफले आहेत.
आशयसौंदर्य : ‘अंकिला मी दास तुझा’ by poet Saint Namdev is a bhang. In this Abhanga, Saint Namdev has requested Shrivitthala to take care of him as his mother. This poem expresses the idea that God should bestow the grace of Maya on us with some examples.
काव्यसौंदर्य : Saint Namdev has given the visions of two mothers, a bird and cow, in the two chapters presented. While glorifying Srivitthala, it is said that when a bird sees its chick falling from a branch, it quickly jumps to the ground to protect it and rescues the chick. Also, when the calf is hungry, the cow rushes to feed it with its milk.
भाषिक वैशिष्ट्ये : The motherly feeling of the bird and the cow is expressed here in very gentle words and the anxiety of the baby strikes the mind. From the verbs ‘झेपावे, धावे’, the baby’s affection is strongly darkened. From the parables of birds and cows, Saint Namdev has interwoven the evidence of motherly love between animals and birds in emotional words.
(आ) आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दांत सांगा.
उत्तर: संत नामदेवांनी श्रीविठ्ठलाला आई म्हटले आहे आणि आपण स्वतः तिचे लहान बालक आहोत, अशी भावना अभंगात व्यक्त केली आहे. आई बाळाची काळजी घेते. त्याचे दुखले खुपले मायेने पाहते. बाळाला काही लागले, तर तिचा जीव कासावीस होतो. तशीच हरिणी आगीत सापडलेल्या बाळाला वाचवण्यासाठी वेगाने धावत जाते. तसेच झाडावरून पडलेल्या पिल्लाला वाचवण्यासाठी पक्षिणी त्याच्याकडे झेप घेते. आई दयाळू आहे. तेव्हा विठूमाउलीने आपला सांभाळ करावा; पालन करावे; संसाररूपी आगीत होरपळणाऱ्या आपल्या मनावर मायेची फुंकर घालावी; कृपा करावी, असे संत नामदेवांना वाटते. अशा प्रकारे संत नामदेवांनी आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे वर्णन कवितेत केले आहे.
Sant Namdev has called Sri Vitthala mother and expressed the feeling that he himself is her little child. The mother takes care of the baby. He sees his pain with great love. If something happens to the baby, her life is ruined. Similarly, the deer rushes to save the baby caught in the fire. Also, the birdie jumps to save the chick that has fallen from the tree. Mother is kind. Then Vithumauli should take care of us; to obey; Maya’s breath should be put on our mind which is burning in the worldly fire; Sant Namdev feels that he should be gracious. In this way Sant Namdev has described the maternal love of mother, animals, birds in the poem.
(इ) संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर: संत नामदेवांनी श्रीविठ्ठलाला माउली (आई) असे म्हटले आहे. जसा आई तिच्या मायेचा वर्षाव बाळावर करीत असते, तसा मायेचा व प्रेमाचा वर्षाव हे देवा, तू माझ्यावर सतत करावास, अशी विनंती संत नामदेव या अभंगात करतात.
संत नामदेवांनी प्राणी-पक्ष्यांमधील आईच्या प्रेमाची तीन उदाहरणे दिली आहेत. झाडावरून पिल्लू जेव्हा अचानक जमिनीवर पडते, तेव्हा पक्षिणी त्याला वाचवण्यासाठी लगेच झेप घेते. वासराला भूक लागते आणि ते हंबरते. त्याची भूक पटकन लक्षात घेऊन गाय दूध पाजण्यासाठी हंबरत वासराकडे धाव घेते. रानात पेटलेल्या मोठ्या आगीत हरिणीचे पाडस सापडले, तर हरिणी चिंतीत होते. व्याकूळ होते. त्याप्रमाणे संत नामदेव श्रीविठ्ठलाला आईच्या प्रेमाचा वर्षाव करायला सांगतात. श्रीविठ्ठलाने पाण्याने भरलेला ढग होऊन चातकरूपी माझ्यावर मायेचा वर्षाव करावा, अशी विनवणी संत नामदेव करतात.
Sant Namdev called Sri Vitthala as Mauli (Mother). In this abhanga, Sant Namdev requests that you, O God, shower your love and love on me continuously, just as a mother showers her love on her baby.
Sant Namdev has given three examples of mother’s love in animals and birds. When a chick suddenly falls from the tree to the ground, the bird immediately jumps to save it. The calf is hungry and is panting. Quickly sensing his hunger, the cow rushes to the calf for milking. A deer’s carcass was found in a big fire in the forest, and the deer was worried. was disturbed. Similarly, Sant Namdev asks Sri Vitthala to shower his mother’s love. Sant Namdev begs Sri Vitthala to become a cloud filled with water and shower maya on me in the form of Chatak.
(ई) पक्ष्यांचा/प्राण्यांचा आपल्या पिलाशी असलेल्या संबंधाबाबत तुमचा अनुभव लिहा.
उत्तर: आम्ही एक कुत्री पाळली आहे. ती देखणी व तब्येतीने चांगली आहे. तिचा सोनेरी रंग मला खूप आवडतो. तिचे नाव आम्ही ‘स्वप्नाली’ ठेवले आहे. ती मला अत्यंत प्रिय आहे. एकदा ती पिल्लांना जन्म देणार होती. आईला तिचे किती कौतुक! तिने स्वप्नालीसाठी बसायला उबदार गादी दिली. तिला चांगले पदार्थ खाऊ घालू लागली. काही काळातच स्वप्नालीने सात पिल्लांना जन्म दिला. त्यांपैकी सहा सोनेरी होती आणि एक पांढरेशुभ्र कापसाच्या गोळ्यासारखे होते. ती गोंडस पिल्ले आईच्या अवतीभवती असायची. आई सगळ्यांना घेऊन पडून राहायची; त्यांना कौतुकाने खाऊ घालायची. एखादे पिल्लू दूर गेलेच, तर स्वप्नाली त्याला भुंकून जवळ बोलावून घ्यायची. एकदा पिल्ले अंगणात खेळत होती. तेव्हा एक घार पिल्लांवर झेप टाकून आली; त्याक्षणी स्वप्नाली घारीच्या अंगावर चवताळून धावून गेली. तिने घारीला पळवून लावले. अशा प्रकारे आईने पिल्लांचे रक्षण केले.
We have adopted a dog. She is beautiful and healthy. I love her golden complexion. We have named her ‘Swapnali’. She is very dear to me. Once she was about to give birth to cubs. Mother appreciates her! She gave a warm mattress for Swapnali to sit on. She started eating good food. Within some time, Swapnali gave birth to seven puppies. Six of them were golden and one was like a whitish cotton ball. Those cute chicks used to be surrounded by their mother. Mother used to lie down with everyone; He used to feed them with appreciation. If a puppy strayed away, Swapnali would bark and call it close. Once the chicks were playing in the yard. Then a swarm came pouncing on the chicks; At that moment, Swapnali ran to the house. She drove away Ghari. In this way the mother protected the cubs.