लिंग (Gender)

माणसांमध्ये पुरुष व स्त्री असा भेद आहे. (man and woman)

प्राण्यांमध्ये नर व मादी असा भेद आहे. (male and female)

उदाहरणार्थ, 

    • मुलगा – पुरुष 
    • मुलगी – स्त्री
    • बैल – नर
    • गाय – मादी

ज्या नामावरून व्यक्तीची जात ओळखली जाते त्याला ‘लिंग’ असे म्हणतात.

मराठीत तीन लिंगे मानतात

(१) पुल्लिंग (Masculine) 

ज्या नामावरून पुरुषजातीचा किंवा नरजातीचा बोध होतो, त्यास पुल्लिंगी शब्द असे म्हणतात.

उदा: मुलगा, बैल, बकरा, मोर, शिक्षक, घोडा, चिमणा, सूर्य, चंद्र, सागर, दगड, कागद, पंखा, इत्यादि.

 

(२) स्त्रीलिंग (Feminine)

ज्या नामावरून स्त्रीजातीचा किंवा मादीजातीचा बोध होतो, त्यास स्त्रील्लिंगी शब्द असे म्हणतात.

उदा: मुलगी, गाय, बकरी, मोरनी, शिक्षिका, घोडी, चिमणी, खुर्ची, शाळा, नदी, वही, खिडकी, इमारत, पाटी, इत्यादि.

 

(३) नपुंसकलिंग (Neuter)

ज्या नामावरून पुरुषजाती अथवा स्त्रीजाती या दोघांचा बोध होत नसेल, त्यास नपुसकलिंगी शब्द असे म्हणतात.

उदा: पुस्तक, घर, वासरू, पाखरू, लेकरू, झाड, शहर, घड्याळ, वाहन, इत्यादि.

काही पुल्लिंगी शब्द अभ्यासा 

माणूस

अनुभव

अर्थ

किल्ला

चेहरा

मासा

पंखा

पाऊस

बेडूक

लाडू

गूळ

फराळ

कचरा

गहू

तास

पक्षी

फळा

रस्ता

कपड़ा

गुण:

नाग

पुरुष

आंबा

मित्र

विषय

सण

समुद्र

हात

डबा

विद्वान

संवाद

सदरा

डोळा

पंख

वर्ग

वाडा

कापूस

दवाखाना

प्राणी

खडू

खेकड़ा

मुलगा

मोर

रंग

ऊस

बग

सूर्य

नारळ

प्रकाश

कुत्रा

कोंबडा

आनंद

डोंगर

निसर्ग

प्रवास

आरसा

 दिवस

पापड

भात

वक्ता

अंधार

किनारा

माठ

चंद्र

दोर

पाय

किरण

चारा

धागा

पावसाळा

दगड

फोटो

वाघ

वारा

राजा

पतंग

पदार्थ

कागद

गुलाब

दवबिंदू

बटाटा

वाटसरू

विद्यार्थी

रुग्ण

काही स्त्रीलिंगी शब्द अभ्यासा

प्रथा

वेल

वाट

वाटी

खुर्ची

बाग

शपथ

अंगठी

मेहनत

झुळूक

दिशा

झोळी

साखर

नदी

बाज

म्हेस

सायकल

ऊर्जा

घोड़ी

चौकशी

छत्री

परीक्षा

बातमी

मुट्टी

टेकडी

पोळी

वास्तू

वीज

ਸਿਰ

भूमी

मांजर

हाक

होळी

कोंबडी

प्रतिज्ञा

डाळ

दिवाळी

बांगडी

शाळा

इमारत

गोष्ट

बाई

माहिती

संघी

उष्णता

उडी

घटना

दोरी

जमीन

ज्योत

कविता

भाजी

स्वच्छता

पाणपोई

पेटी

कहाणी

भाषा

वाफ

हवा

कैरी

गट्टी

थैली

माती

आई

फांदी

बकरी

गरज

शांतता

मादी

मासोळी

आठवण

दरी

काही नपुंसकलिंगी शब्द अभ्यासा

घरटे

धुके

प्रेम

लाकूड

काम

घुंगरू

नाक

फूल

वजन

कुटुंब

नाव

मन

वारूळ

उद्यान

गवत

झाड

पीक

मूल

वासरू

कन

गाढव

तंत्र

दप्तर

पोट

रूप

सरबत

घर

कमळ

दार

प्रदूषण

रोपटे

साहस

कवच

वादळ

आकाश

क्षितिज

जनावर

पात्र

बोट

वादव

इंधन

खेडे

ज्ञान

पान

पुस्तक

मैदान

शिक्षण

ओझे

गाणे

तोंड

पेन

राष्ट्र

शेत

कपाट

गाव

अंग

कुलूप

चित्र

पत्र

बटन

वर्ष

अक्षर

केळे

जंगल

पाणी

बियाणे

लिंगबदल:

पुल्लिंगी नामांचे स्त्रीलिंगी नामांत रूपांतर करणे आणि स्त्रीलिंगी नामांचे पुल्लिंगी नामांत रूपांतर करणे याला लिंगबदल म्हणतात.

गट – १ [अ – आ, इका]

(पुल्लिंगी – स्त्रीलिंगी)

शिष्य – शिष्या

प्राध्यापक – प्राध्यापिका

लेखक – लेखिका

मार्गदर्शक – मार्गदर्शिका

मुख्याधापक – मुख्याध्यापिका

वृद्ध – वृद्धा

बालक – बालिका

सेवक – सेविका

शिक्षक – शिक्षिका

कोकीळ – कोकिळा

गायक – गायिका

नायक – नायिका

गट – २ [अ, आ – ई]

(पुल्लिंगी – स्त्रीलिंगी)

लाडका  – लाडकी

लोटा – लोटी

लांडगा – लांडगी

थोरला – थोरली

पाहुणा – पाहुणी

काका – काकी

कुत्रा – कुत्री

कोंबडा – कोंबडी

कोल्हा – कोल्ही

कणगा – कणगी

काळा – काळी

कुमार – कुमारी

खडा – खडी

गाडा – गाडी

तरुण – तरुणी

चित्रकार – चित्रकर्ती

राजकुमार – राजकुमारी

रेडा – रेडी

चिमणा – चिमणी

चिमुकला – चिमुकली

सखा – सखी

सावळा – सावळी

सुरा – सुरी

स्वामी – स्वामिनी

हिरवा – हिरवी

हंस – हंसिनी

निळा – निळी

पावा – पावरी

पोरगा – पोरगी

बाहुला – बाहुली

वानर – वानरी

वेडा – वेडी

विद्यार्थी – विद्यार्थिनी

शहाणा – शहाणी

भाकरा – भाकरी

मामा – मामी

मुलगा – मुलगी

मेंढा – मेंढी

राग – रागिणी

बकरा – बकरी

म्हातारा – म्हातारी

थैला – थैली

देव – देवी

दोरा – दोरी

एकटा – एकटी

छोटा – छोटी

दांडा – दांडी

नद – नदी

नाचरा – नाचरी

पक्षी – पक्षिणी

ओला – ओली

आरसा – आरशी

गट – ३ [अ, ई – ईण]

(पुल्लिंगी – स्त्रीलिंगी)

वाघ – वाघीण

शेतकरी – शेतकरीण

शिंपी – शिंपीण

कुंभार – कुंभारीण

डुक्कर – डुकरीण

नाग – नागीण

पोपट – पोपटीण

भिकारी – भिकारीण

ससा – सशीण

साप/सर्प – सर्पीण

साहेब – साहेबीण

सावकार – सावकारीण

सुतार – सुतारीन

हत्ती – हत्तीण

हरीण – हरीण

माकड – माकडीण

गट – ४ [अनियमित]

(पुल्लिंगी – स्त्रीलिंगी)

आजोबा – आजी

गृहस्थ – गृहिणी

पुरुष – स्त्री, बाई

बोका – मांजर

पुतण्या – पुतणी

बोकड – शेळी, बकरी

बुआ – बाई

बैल – गाय

बंधू – भगिनी

दादा – ताई

दादा – वहिनी

माता – पिता

मासा – मासोळी

कवी – कवियत्री

नर – मादी

काळवीट – हरिणी

नवरा – बायको

बाबा, वडील – आई

नोकर – नोकराणी

बाप – आई, माय

पुत्र – कन्या

बेडूक – बेडकी

मामा – मामी

शिपाई – शिपाईन

श्रीमान – श्रीमती

सम्राट – सम्राज्ञी

भगवान – भगवती

युवराज – युवराज्ञी

विद्वान – विदुषी

राजा – राज्ञी

उंदीर – उंदरीन

गंथकर्ता – गंथकर्ती

युवा – युवती

महाराज – महाराणी 

मोर – लांडोर

मित्र – मैत्रीण

मुंगळा – मुंगी

युवक – युवती

राजा – राणी

विद्वान – विदुषी

वीर – वीरांगना

रेडा – म्हैस

साधू – साध्वी

सर – मॅडम