Maharashtra Board Textbook Solutions for Standard Five

पाठ १३ – अनुभव -१

शब्दार्थ

धाड्धाड् आपटणे – जोरजोरात आदळणे

पाऊस धोऽ धोऽ कोसळणे – खूप जोराचा पाऊस पडणे

गुणगुणणे – हळू आवाजात गाणे 

पानांआड – पानांमागे 

बिलगणे – प्रेमाने मिठी मारणे

स्वाध्याय

प्र. १. एका वाक्यात उत्तरे लिहा.

(अ) मारियाच्या घराला कुलूप का होते?

उत्तर: मारियाचे आईबाबा लग्नाला गेले होते म्हणून घराला कुलूप होते.

 

(आ) मारियाने दारे, खिडक्या का बंद केल्या?

उत्तर: अचानक खिडक्यांची दारे एकमेकांवर धाड्याड् आपटू लागली म्हणून मारियाने दारे, खिडक्या बंद केल्या.

 

(इ) पानांआड लपलेले पक्षी केव्हा बाहेर आले ?

उत्तर: पाऊस थांबल्यावर पानांआड लपलेले पक्षी बाहेर आले.

 

(ई) मारिया आईला का बिलगली?

उत्तर: खूप वेळ वाट पाहून कंटाळल्यामुळे मारियाला आई दिसताच ती तिला बिलगली.

प्र. २. जोड्या जुळवा 

  ‘अ’ गट      

(१) ढगांचा     

(२) विजांचा   

(३) पाण्याचा  

(४) पंखांचा    

      ‘ब’ गट

(अ) खळखळाट

(आ) फडफडाट

(इ) गडगडाट

(ई) कडकडाट

उत्तर:

(१) ढगांचा – गडगडाट

(२) विजांचा – कडकडाट

(३) पाण्याचा –  खळखळाट

(४) पंखांचा – फडफडाट

प्र. ३. वाचा. सांगा. लिहा.

(अ) शब्दांची पुनरावृत्ती झालेले शब्द.

उदा. धाडधाड. 

उत्तर: टप्टप, फडफड, हळूहळू, कडकड, गडगड, खळखळ.

 

(आ) नादमय शब्द,

उदा., कडकडाट, गडगडाट यांसारखे तुम्हांला माहीत असलेले शब्द सांगा.

उत्तर: फडफडाट खळखळाट, तडतडाट, ढम् ढम्, टकटक.

प्र.४. खालील शब्द वाचा व पाहून तसेच लिहा. 

(अ) घड्याळ

(आ) खिडक्या

(इ) हळूहळू

(ई) गुणगुणू

(उ) रिमझिम

(ऊ) खळखळाट

प्र. ५. रिकाम्या आगी विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्ये पूर्ण लिहा.

(अ) पाऊस सुरू झाला. पाऊस _____.

उत्तर: पाऊस बंद झाला.

 

(आ) मारिया सावकाश दाराकडे गेली. मारिया _____.

उत्तर: मारिया जलद दाराकडे गेली.

प्र. ६. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

(अ) चढणे  

उत्तर: उतरणे

 

(आ) आठवणे  

उत्तर: विसरणे

 

(इ) उंच 

उत्तर: सखल

 

(ई) बाहेर  

उत्तर: आत

 

(उ) स्वच्छ 

उत्तर: अस्वच्छ

 

(ऊ) थांबणे 

उत्तर: जाणें

प्र. ७. पावसातील तुमचा अनुभव सांगा.

उत्तर: एकदा मी शाळा सुटल्यानंतर एकटाच घरी परतत होतो. अचानक आकाशात काळे ढग जमा झाले. विजा कडकडायला लागल्या. ढगांचा गडगडाटही सुरू झाला. मी खूप घाबरलो. रस्त्यात कोणी दिसत नव्हते. आता काय करावे मला समजेना. मी माझ्या चालण्याची गती वाढवली. हवेत गारवा पसरलेला असतानाही माझ्या अंगाला घाम फुटला होता आणि अचानक पावसाला सुरुवात झाली. माझ्याकडे छत्री नसल्याने टपोऱ्या थेंबांचा पाऊस माझ्या अंगावर कोसळत होता. पावसात भिजायला सगळ्यांनाच आवडते पण आज मला मात्र एकटेपणामुळे भीती वाटत होती, मी जलद गतीने घराच्या दिशेने चालत होतो. तेवढ्यात मला दूरवर एक आजोबा दिसले. मला थोडेसे हायसे वाटले. त्यांच्याजवळ जाताच माझ्या चेहऱ्यावरील भाव पाहून मी घाबरलो आहे हे त्या आजोबांनी ओळखले. त्यांनी मला आपल्या छत्रीखाली घेतले. मी आजोबांना मला घरापर्यंत सोडण्याची विनंती केली. आजोबांनीही माझी गरज ओळखून मला घरापर्यंत आणून सोडले. घरी पोहोचल्यानंतर मला खूपच आनंद झाला.

प्र. ८. पावसाळ्यात तुम्ही आरोग्याविषयी कोणती काळजी याल?

उत्तर: 

(१) पाणी उकळून पिण्यासाठी वापरू.

(२) जेवणापूर्वी जेवण गरम करूनच जेवू. 

(३) अंघोळीनंतर किंवा पावसात भिजल्यानंतर केस ओले न ठेवता टॉवेलने पूर्णपणे कोरडे करू. 

(४) सर्दी, ताप असे आजार झाल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊ. 

(५) रस्त्यावरील कोणतेही उघडे पदार्थ खाणार नाही. 

(६) अंगावर घालण्यासाठी ओल्या कपड्यांचा उपयोग करणार नाही.

प्र. ९. खाली दोन प्रकारचे शब्दसमूह दिलेले आहेत, ते वाचा. कोणत्या शब्दसमूहांचा अर्थ कळतोय कोणत्या शब्दांवरून समजून घ्या.

IMG 20230920 112359 पाठ १३ – अनुभव-१

मागील तक्त्यातील दुसऱ्या शब्दसमूहांत कोणती क्रिया झाली हे दाखवणारे शब्द दिले आहेत. उदा. उघडले, बंद केल्या, बिलगली. क्रिया सांगणाऱ्या या शब्दामुळे वाक्यांचा अर्थ कळतो. या शब्दांना क्रियापद म्हणतात.

प्र. १०. खालील शब्दसमूह वाचा. त्यांतील क्रियापदे ओळखा. त्यांखाली रेघ ओढा: 

(अ) पक्षी बाहेर आले.

उत्तर: आले

 

(आ) मारियाने आकाशाकडे पाहिले.

उत्तर: पाहिले

 

(इ) दारावरची बेल वाजली.

उत्तर: वाजली

 

(ई) मारिया पळत दाराकडे गेली. 

उत्तर: गेली

प्र.११. क्रियापदे घालून वाक्ये पूर्ण करा.

(अ) मारिया घरी _____.

उत्तर: आली.

 

(आ) मारिया कविता _____.

उत्तर: गुणगुणू लागली.

 

(इ) मारियाने दार _____.

उत्तर: उघडले.

 

(ई) मी चेंडू _____.

उत्तर: फेकला.

 

(उ) ताई पुस्तक _____.

उत्तर: वाचते.

प्र.१२ खालील शब्द याचा त्या शब्दांची रूपे शोधा शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.

(अ) सूर्य

(आ) पर्वत

(इ) चंद्र

(ई) समुद्र

(उ) कैन्या

(ऊ) पन्या

(ए) प्राणी

(ऐ) प्रकाश

(ओ) महाराष्ट्र

(औ) ट्रक

उत्तर: विद्यार्थ्यांनी हे स्वतः करावे.

उपक्रम : पावसाबरोबर आलेले शब्द वाचा. त्या शब्दांचा उपयोग करून वाक्ये सांगा. 

उदा., पावसाची बुरचुर सुरू झाली.

उत्तर: 

(१) टपटपणारा – पावसाचे थेंब टप्टप् पानांवर पडू लागले.

(२) मुसळधार – मुसळधार पावसाने घरे वाहून गेली.

(३) जोरदार – सकाळपासून जोरदार पावसाच्या सरी कोसळत होत्या. 

(४) दमदार – जूनमध्ये पावसाचे दमदार आगमन झाले.

(५) रिमझिम – दिवसभर रिमझिम पाऊस पडत होता.

IMG 20230920 112340 पाठ १३ – अनुभव-१